आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arab People Luring Poor Families And Marrying Their Daughter Only For Sex

सेक्‍ससाठी 4 आठवड्यांचे लग्‍न, भारतात परदेशी नागरिकांनी चालवला बाजार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात एकीकडे बलात्‍काराच्‍या संख्‍येत वाढ होत आहे. तर दुसरीकडे सेक्‍स टुरीझमचा एक नवा अड्डा म्‍हणूनही देश बनू लागला आहे. आखाती देश आणि आफ्रिकेतून मुस्लिम समुदायाचे अनेक जण एका महिन्‍यांसाठी बायको खरेदी करण्‍यासाठी भारतात येऊ लागले आहेत. अशाच लग्‍नानंतर पळालेल्‍या एका 17 वर्षीय मुलीने केला आहे. हा प्रकार दक्षिण भारतातील शहरांमध्‍ये श्रीमंत परदेशी नागरिक, एजंट आणि काझींच्‍या संगनमताने सर्रास सुरु आहे. गरीब मुस्लिम कुटुंबियाच्‍या हलाखीच्‍या स्थितीचा फायदा या लोकांकडून उचलण्‍यात येत आहे. या लोकांना पैशाचे आमिष दाखवून मुलींचे लग्‍न लावण्‍यात येते. अशाच लग्‍नात अडकलेली नौशीन तबस्‍सुम गेल्‍या महिन्‍यात पळून जाण्‍यात यशस्‍वी झाली. तिने पोलिस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. त्‍यानंतर पोलिसांना प्रकरणातील गांभीर्य कळले.


नौशीनने सांगितले की, तिच्‍या कुटुंबियांनी सुदानच्‍या एका माणसासोबत लग्‍न ठरवले होते. लग्‍न केवळ 4 आठवड्यांसाठी होते. त्‍यासाठी त्‍याने 1 लाख रुपये दिले होते. तिच्‍या काकूने तिला एका हॉटेलमध्‍ये नेले होते. तिथे आणखी 3 अल्‍पवयीन मुली होत्‍या. त्‍यांची ओळख 44 वर्षांच्‍या एका व्‍यक्तीसोबत करुन देण्‍यात आली. हा व्‍यक्ती तेल कंपनीचा अधिकारी होता. तोच त्‍यांचा नवरदेव होता. त्‍याचे नाव होते उसामा इब्राहिम मोहम्‍मद. त्‍याने यापूर्वी खारतून येथील 2 मुलींसोबत लग्‍न केले होते. त्‍यानंतर तो नौशीनच्‍या घरी आला. तिथे काझीने लग्‍न लावले. दुस-या दिवशी तो पुन्‍हा तिच्‍या घरी आला आणि शारीरीक संबंधासाठी दबाव टाकू लागला. नौशीनने त्‍याला नकार दिला. तिच्‍या कुटुंबियांनी त्‍याला समजावून परत पाठविले आणि नौशीनला तयार करु, असे आश्‍वासनही त्‍याला दिले. मात्र, नौशीनने संधी साधून पलायन केले. पोलिसांच्‍या पेट्रोलिंग व्‍हॅनने तिला हेरले. त्‍यानंतर तिला त्‍यांनी ठाण्‍यात नेले. घडलेला सर्व प्रकार तिने पोलिसांना सांगितला. हा प्रकार ऐकून पोलिसही थक्‍क झाले.

पोलिसांनी सुदानचा हा नवरदेव, काझीआणि नौशीनच्‍या काकूला अटक करण्‍यात आली आहे. परंतु, तिचे आईवडील पळून गेले. त्‍यांच्‍या अटकेसाठी वॉरंट जारी केला आहे. भारतीय कायद्यानुसार नौशीन अल्‍पवयीन असून वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्‍याशिवाय तिचे लग्‍न होऊ शकत नाही. या सर्वांवर बाल विवाह, बलात्‍कारास मदत करणे आणि कट रचल्‍याचा आरोप लावण्‍यात आला आहे.