आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - आम आदमी पक्षाचे (एएपी) नेते अरविंद केजरीवाल यांनी आगामी दिल्ली विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली आहे. उमेदवारीसाठी त्यांनी पक्षाकडे रितसर अर्ज दाखल केला असून त्यात त्यांनी उत्पन्नही जाहीर केले आहे. त्यात त्यांनी एकूण 71 लाख रुपयांची संपत्ती दाखविली आहे. गाझियाबाद येथे इंदिरापुरम भागात 70 लाख रुपये किंमतीचा फ्लॅट आणि 1 लाख रुपयांचे फिक्स डिपॉझीट असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तसेच पत्नीच्या नावावरही एक फ्लॅट असून त्याची किंमत 1 कोटी रुपये असल्याचेही केजरीवाल यांनी नमूद केले आहे. तसेच पत्नीच्या नावाने बँकेत 1 लाख रुपये जमा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पक्षाने केजरीवाल यांच्या अर्जासह संपूर्ण माहिती पक्षाच्या वेबसाईटवर उपलब्ध करुन दिली आहे. आता त्यांच्या अर्जावर इतर लोकांचे मत मागविण्यात येणार आहे.
केजरीवाल यांनी नुकतेच दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्याविरुद्ध निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले होते. त्यासाठी आता त्यांनी पूर्व दिल्लीच्या मतदार यादीतही नाव नोंदविले आहे. गाझियाबाद येथील निवासाचा पत्ता त्यांनी बदलून नाव नोंदविले. त्यापूर्वी तेथील मतदार यादीतूनही त्यांनी नाव वगळले आहे. हा बदल केला नसता तर त्यांना दीक्षित यांच्याविरुद्ध निवडणूक लढविता आली नसती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.