आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ARJIT KANSAL WINNER OF MICROSOFT POWER POINT 2010

130 देशातील 4 लाख मुलांमधून त्याने जिंकला MICROSOFT चॅम्पियनशिपचा प्रथम पुरस्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(माइक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट 2010 चॅम्पियनशिपच्या चषकासमवेत अरजित कन्सल)
नवी दिल्ली - दिल्लीत राहणार्‍या अरजित कन्सल याने 2014 च्या 'माइक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट 2010' स्पेशलिस्ट वर्ल्ड चॅम्पियनचा पहिल्या क्रमांक पटकावला आहे. तर त्याचा मित्र शशांक बत्राने एक्सेल 2007 कॅटेगरीचे दुसरे स्थान मिळवले आहे. 130 देशांमधील 4 लाख स्पर्धकांमधून अरजितने हा विजय मिळवला आहे. ही स्पर्धा अमेरिकेच्या कॅलेफोर्निया येथे आयोजित करण्यात आली होती. 27 जुलैला सुरू झालेली स्पर्धा 30 जुलैपर्यंत सुरू होती. या स्पर्धेदरम्यान मायक्रोसॉफ्टच्या वर्ड, एक्सल आणि पॉवर पॉईंट या संबंधी ही परिक्षा होती. पुरस्कार सोहळ्यादरम्यान कन्सल याला 5 हजार डॉलर (3 लाख रुपये) ची शिष्यवृत्ती देण्यात आली. थआयलंडच्या पोंग सॅटर्न या स्पर्धेत दुसर्‍या क्रमांकावर आहे.

जगभरातील स्पर्धकांनी घेतला सहभाग
अरजीत पीतमपूरा येथील महाराज अग्रेसन मॉडेल शाळेचे विद्यार्थी आहेत. या स्पर्धेत 7 लाखांपेक्षा जास्त लोकांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत जगभरातील मायक्रोसॉफ्ट चॅम्पियन्सनेही भाग घेतला होता. यांना तर या सॉफ्टवेअरचे सर्व टूल्सबद्दल सखोल माहिती आहे. अंतिम फेरीत सर्व स्पर्धकांपेक्षा वेगळे करत पॉवर पॉईंटवर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवण्यात आले. ज्यामध्ये कन्सलने वेगवेगळ्या देशातील 123 विद्यार्थ्यांना मागे टाकत पहिले स्थान पटकावले.

दहावीत मिळाले होते 10 ग्रेड
कन्सलने सांगितले की, या स्पर्धेसाठी त्यांना सायबर लर्निंगने स्पाँसरशिप दिली होती. कन्सलने मागील वर्षी दहावीत असताना 10 ग्रेड मिळवले होते. जेव्हा मी या स्पर्धेच्या विजयाची बातमी घरच्यांना दिली तेव्हा ते खुप खुश झाले.
काय आहे मायक्रोसॉफ्ट ऑफिस स्पेशलिस्ट सर्टीफिकेशन
पुढच्या वर्षी 2015 मध्ये ही स्पर्धा टेक्सासच्या दलासमध्ये आयोजित करण्यात येईल. या स्पर्धेचे आयोजक सर्टीपोर्ट कंपनी जगभरातील 12000 सेंटर्सवर या स्पर्धेचे आयोजन करून स्पर्धकांची निवड करते. ही कंपनी 1997 मध्ये सुरू झाली होती. हे मायक्रोसॉफ्ट ऑफिस स्पेशलिस्ट सर्टीफिकेशन विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्यास मदत करते.

कोणी कोणी मिळवले पहिले स्थान
MS WORD 2010 ची चॅम्पियनशिप मकाऊच्या चॅन लेन वेंगने जिंकली
EXCLE 2010 ची चॅम्पियनशिप मकाऊच्या किन लेन लो ने जिंकली
MS WORD 2007 ची चॅम्पियनशिप यूएसएच्या डोम्नीक्यू डोवर्ड याने जिंकली
EXCEL 2007 ची चॅम्पियनशिप ब्राझिलच्या लॅनने जिंकली
POWER POINT 2007 ची चॅम्पियनशिप युएसएसच्या टायलर मिलिसने जिंकली

पुढील स्लाईडमध्ये पाहा, अरजितचा जल्लोष