आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्यानमार सीमेवर लष्कराची कारवाई, दहशतवाद्यांचे शिबिर केले उद‌्ध्वस्त; एक ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इटानगर/नवी दिल्ली- भारतीय सैन्य दलाने अरुणाचल प्रदेश-म्यानमार सीमेवर साेमवारी माेठी कारवाई केली. सैन्याच्या विशेष दलाने नागा दहशतवादी संघटनेचे (एनएससीएन) दहशतवादी शिबिर उद्ध्वस्त केले. या कारवाईत एक दहशतवादी मारला गेला, तर एक जखमी झाला. तसेच सैन्य दलाचा एक जवानदेखील जखमी झाला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या मंगळवारच्या म्यानमार दाैऱ्याच्या एक दिवसापूर्वी भारतीय लष्कराने ही कारवाई केली गेली, हे विशेष.

याबाबत माहिती देताना सैन्य दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अरुणाचल प्रदेशाच्या लाेंगडिंग जिल्ह्यातील वाेत्नू येथे सकाळी सुरू झालेली ही कारवाई संध्याकाळपर्यंत सुरूच हाेती. तथापि, या कारवाईदरम्यान सीमा पार केली गेली नाही. तसेच काही दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले. या शिबिरातून एक एके-४७ रायफल, दारूगाेळा व रेडिअाे सेट जप्त करण्यात अाला. गुप्त सूचनांद्वारे सैन्याला या शिबिराची अगाेदरच माहिती मिळाली हाेती. ही माेहीम गेल्या दाेन-तीन दिवसांपासून सुरू करण्यात अाली हाेती. मात्र, सैन्य दलाने साेमवारी खरी कारवाई केली. त्यात २१ पॅराचे (एसएफ)जवान सहभागी झाले हाेते. मागील दहा दिवसांत दाेन इतर ठिकाणी झालेल्या कारवाईत १ सप्टेंबर राेजीही एनएससीएनचा दहशतवादी मारला गेला हाेता, असे सूत्रांनी सांगितले. ही सामान्य कारवाई आहे, अशी प्रतिक्रिया लष्करप्रमुख रावत यांनी व्यक्त केली.
बातम्या आणखी आहेत...