नवी दिल्ली - लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी सैनिकांना सबुरीचा सल्ला दिला आहे. सोशल मीडिया ही दुधारी तलवार आहे. त्याच्यामुळे अनेकदा धोकादायक स्थिती उद््भवू शकते. त्यामुळे लष्करातील जवानांनी सोशल मीडियावर
आपल्या तक्रारी टाकू नयेत. त्यासाठी लष्करी मुख्यालयापासून खालच्या स्तरापर्यंत तक्रारपेट्या ठेवल्या जातील. कोणत्याही रँकचा जवान त्यात तक्रार टाकू शकेल. लष्करप्रमुख स्वत: या तक्रारी पाहतील. तक्रारकर्त्याचे नाव गुप्त राहील. नाव उघड झाले तर लष्करप्रमुखाच्या स्टाफला जबाबदार धरले जाईल.
एक दिवस अगोदरच लान्स नायक यज्ञप्रतापचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. लष्करी अधिकारी आपल्या सहायक जवानांचे शोषण करतात, अशी त्यांची तक्रार होती. शुक्रवारी वार्षिक पत्रकार परिषदेत रावत यांनी आवाहन केले की, जवानांनी लष्कराच्या वरिष्ठ नेतृत्वावर विश्वास ठेवावा. समस्यांची सोडवणूक केली जाईल.
सोशल मीडिया दुधारी, घातक स्थिती शक्य : रावत
दुधारी तलवार आहे. अनेकदा त्यामुळे धोकादायक स्थिती उद्भवू शकते. यज्ञ प्रताप यांच्या तक्रारीची पद्धत बरोबर नाही. ते जास्तीत जास्त काळ चालक राहिलेले आहेत. काम पसंद नव्हते तर कमांडरला सांगायला हवे होते. लष्कराचे काम विश्वास आणि संवादावर चालते. परोक्ष पद्धतीने समस्या सांगितल्यामुळे परिस्थिती सुधारण्याऐवजी बिघडण्याचीच शक्यता असते.
शांततेच्या काळात बिगर लष्करी सहायक देण्याचा विचार :
जनरल रावत म्हणाले की, अधिकाऱ्यांसाठी बड्डी (सेवादार किंवा सहायक) आवश्यक आहे. तो घरी आणि कार्यालयात मदत करतो. मात्र घरगुती काम करण्याचे त्याच्यावर बंधन नाही. फील्डवर मोबिलायजेशन किंवा सुद्धाच्या वेळी रेडिओ सेटसारखी उपकरणे चालवावी लागतात. त्यामुळे जवानालाच बड्डी नेमले जाते. शांततेच्या काळात बिगर लष्करी सहायक देण्याबाबत विचार होऊ शकतो. बड्डी व्यवस्थेमुळे अधिकारी व जवानात संवाद साधला जातो.
कॅप्टन ते मेजरपर्यंत एक, वरच्या रँकला मिळतात दोन सहायक :
जनरल रावत म्हणाले की, सहायकाची सुविधा जेसीओपासून सुरू होते. शांततेच्या काळात चार-पाच जेसीओंना एक सहायक मिळतो. कॅप्टनपासून ते मेजर रँकपर्यंत एक- एक आणि त्यावरील रँकसाठी दोन-दोन सहायक मिळतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १२ लाख संख्या असलेल्या लष्करात सुमारे १ लाख जवान सहायकाचे काम करत आहेत.
जनरल बक्षींना सरकारचा निर्णय मान्य :
जनरल रावत यांनी पूर्व कमांडचे कमांडर जनरल प्रवीण बक्षींशी संबंधित वादावरही भाष्य केले. ते म्हणाले, पूर्व कमांडर व आम्ही नेहमीच एकमेकांच्या संपर्कात आहोत. सरकारचा निर्णय मला मान्य आहे आणि लष्करात आपली भूमिका निभावायला ते तयार आहेत,असे त्यांनी सांगितले आहे.
सोशल मीडियावर काहीही लिहिण्यापूर्वी खबरदारी घ्या :
जवानांनी सोशल मीडियावर काहीही लिहिण्यापूर्वी खूपच खबरदारी घेतली पाहिजे. देशाच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड होणार नाही आणि सुरक्षा दलाच्या मनोधैर्यावरही त्याचा परिणाम होणार नाही, हे लक्षात ठेवावे.
- किरण रिरिजू, गृह राज्यमंत्री
पाकिस्तानने ऐकले नाही तर पुन्हा सर्जिकल स्ट्राइक
पाकिस्तानकडून वारंवार होत असलेल्या युद्धबंदी उल्लंघनाबाबत लष्करप्रमुख म्हणाले की, नजीकच्या काळात युद्धबंदीचे उल्लंघन कमी झाले आहे. जर पाकिस्तानने ऐकले नाही तर भारत सर्जिकल स्ट्राइकसारखे पाऊल पुन्हा उचलू शकतो. पाकिस्तानच्या छुप्या युद्धामुळे भारतातील सामाजिक सौहार्द बिघडत चालले आहे.
लष्करात भविष्याचे तंत्रज्ञान
आजपासून दशकभरापेक्षाही पुढे लागू होईल असे भविष्याचे तंत्रज्ञान लष्करात आणण्याची योजना आहे. जवान हायटेक करून लांब पल्ल्यावर घातक मारा करू शकणारी शस्त्रे लष्करात सामील करण्याच्या दिशेने नियोजन केले जात आहे, असे लष्करप्रमुख म्हणाले.
पोस्ट करताना जरा जपूनच
जवानांनी सोशल मीडियावर काहीही लिहिण्यापूर्वी खूपच खबरदारी घेतली पाहिजे. देशाच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड होणार नाही आणि सुरक्षा दलाच्या मनोधैर्यावरही परिणाम होणार नाही, हे लक्षात ठेवावे.
- किरण रिजिजू, गृह राज्यमंत्री