नवी दिल्ली - भूदल प्रमुख जनरल दलबीर सिंह सुहाग यांनी अधिकाऱ्यांना ताकिद दिली आहे, की त्यांच्या भाषणानंतर कोणीही टाळ्या वाजवणार नाही. मंगळवारी एका कार्यक्रमात त्यांच्या भाषणानंतर टाळ्या वाजल्या होत्या. त्यानंतर त्यांनी स्पष्टपणे अधिकाऱ्यांना बजावले की, माझ्या भाषणानंतर युनिफॉर्ममधील अधिकारी टाळ्या वाजवणार नाहीत. ते म्हणाले, की
आपण युनिफॉर्ममध्ये आहोत आणि आपण प्रोटोकॉल पाळला पाहिजे. यावेळी त्यांनी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या विधानाचीही आठवण करुन दिली.
गेल्या महिन्यात संरक्षणमंत्री पर्रिकर यांनी कमांडर कॉन्फरन्समध्ये संबोधित केल्यानंतर गणवेषातील जवानांनी टाळ्या वाजवल्या होत्या. तेव्हा ते म्हणाले होते, की माझ्या माहितीनूसार गणवेषातील लोक कोणाच्याही भाषणानंतर टाळ्या वाजवत नाहीत?
काय आहे नियम
लष्कराच्या गणवेषात असताना टाळी वाजवण्यास मनाई आहे. फक्त स्टँडिंग ओव्हिएशन दिले जाते. त्यात उभे राहतात आणि रिदमवर फक्त तीन टाळ्या वाजवल्या जातात.