आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्ही. के. सिंह यांनीच रोखली होती पदोन्नती, लष्करप्रमुख सुहाग यांचा प्रतिज्ञापत्रात आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जनरल दलबीरसिंग सुहाग यांना 2014 मध्‍ये आर्मी चीफ बनवण्‍यात आले. - फाइल - Divya Marathi
जनरल दलबीरसिंग सुहाग यांना 2014 मध्‍ये आर्मी चीफ बनवण्‍यात आले. - फाइल
नवी दिल्ली - माजी लष्करप्रमुख आणि विद्यमान परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी आपला छळ केला होता, असा आरोप लष्करप्रमुख दलबीरसिंह सुहाग यांनी केला आहे. व्ही. के. सिंह यांनी जाणूनबुजून, सूडबुद्धीने माझी बढती रोखली होती, असे त्यांनी म्हटले आहे. लष्करप्रमुखाने आपल्या माजी लष्करप्रमुखावर आणि विद्यमान केंद्रीय मंत्र्यावर असा आरोप करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

जनरल सुहाग यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात हा आरोप केला आहे. सुहाग यांना लष्करप्रमुख करण्याच्या निर्णयाविरोधात लेफ्टनंट जनरल रवी दास्ताने यांनी याचिका दाखल केली आहे. सुनावणीच्या वेळी सुहाग यांचे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले होते. सुहाग यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की , मी लष्कराचा कमांडर होऊ नये यासाठी २०१२ मध्ये तत्कालीन लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांनी माझा छळ केला होता. माझ्यावर निर्बंध लादण्यात आले होते. त्यामुळे माझ्या नियुक्तीला आव्हान दिले जाऊ शकत नाही. माझ्यावर अन्याय झाल्याचे संरक्षण मंत्रालयानेही मान्य केले होते. त्यामुळे कारणे दाखवा नोटीस अयोग्य आहे.

जोरहाटची कारवाई वादाचे मूळ : आसामच्या जोरहाटमध्ये एका कारवाईनंतर चौकशी मंडळ स्थापन करण्यात आले होते. व्ही.के. सिंह यांनी २०१२ मध्ये लष्कराच्या ३ कोअरचे जनरल ऑफिसर इन कमांड दलबीरसिंह यांच्यावर काही िनर्बंध घातले होते. जनरल सुहाग यांच्यानुसार, ही कारवाई झाली तेव्हा मी सुटीवर होतो. कोर्ट ऑफ एन्क्वायरीतही काही सिद्ध झाले नाही. नंतर लष्करप्रमुख विक्रम सिंह यांनी त्यांना पूर्व विभागाच्या कमांडरपदी नियुक्त केले होते. विक्रम सिंह यांच्यानंतर सुहाग हे लष्करप्रमुख झाले होते. त्यावेळी अन्याय झाला, असे दस्ताने यांचे म्हणणे आहे.

एएफटीतही त्यांनी हाच युक्तिवाद केला होता
लष्करी सूत्रांच्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयात दाखल या प्रतिज्ञापत्रात नवे काही नाही. हे प्रतित्रापत्र याआधीही सशस्त्र दल न्यायाधिकरणातही (एएफटी) दाखल झाले आहे. तेव्हा जनरल सुहाग लष्करप्रमुख नव्हते आणि व्ही. के. सिंह हेही मंत्री नव्हते.
बातम्या आणखी आहेत...