आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैन्य पेपरफुटीप्रकरणी कोर्ट ऑफ इन्क्वायरी, लष्करी अधिकाऱ्यांवर संशय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लष्कर भरती परीक्षा पेपरफुटीप्रकरणी लष्कराने कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत. रविवारी परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर ६ केंद्रांवरील परीक्षा रद्द करावी लागली होती. या प्रकरणी माजी सैनिकासह १८ लोकांना अटक झाली होती. लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपूर्ण माहिती दिल्यानंतर लष्कराच्या दक्षिण कमांडने कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले. 
 
या प्रकरणात लष्कराचे अधिकारी व कर्मचारीही सहभागी असल्याचा संशय असल्याने त्याचीही चौकशी केली जात आहे. चौकशीच्या आधारे काही केंद्रांवरील परीक्षा रद्द केली जाऊ शकते. कारकून, स्ट्राँगमन अशा विविध श्रेणीतील पदांसाठी देशातील ५२ केंद्रांवर ही परीक्षा झाली होती.
बातम्या आणखी आहेत...