आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Army Gave Befitting Reply To Pakistan On Beheading Of Soldiers: Gen Bikram Singh

जवानाचे शिर कापणार्‍या पाकला चोख प्रत्युत्तर दिले - निवृत्त जनरल बिक्रमसिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जानेवारी 2013 मध्ये एका भारतीय जवानाचे शीर कापून नेणार्‍या पाकिस्तानी जवानांची क्रूर कारवाई अजूनही विसरू शकत नाही. त्या वेळी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले होते, अशी आठवण निवृत्त लष्करप्रमुख जनरल बिक्रमसिंग यांनी सांगितली
या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर जनरल सिंग म्हणाले, पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले होते हे खरे, परंतु जेव्हा सीमेवर बळाचा वापर करायचा असतो तेव्हा तो देशाचे धोरण आणि सामरिक पातळीवर विचारात घ्यावा लागतो. भारतीय जवानांच्या मृतदेहाची अवहेलना करण्याचे काम स्थानिक कमांडर्सनी केले होते. याच्याशी पाक लष्करातील वरिष्ठ अधिकार्‍यांचा संबंध नव्हता.
जानेवारी 2013 लान्सनायक हेमराज याचे शीर पाकिस्तानी जवान व दहशतवाद्यांनी धडावेगळे केले होते. पूंछ सेक्टरमध्ये हेमराजचा सहकारी लान्सनायक सुधाकरसिंह याचा छिन्नविछिन्न मृतदेह सापडला होता. या घटनेनंतर सहा दिवसांनी जनरल सिंह यांनी इशारा देताना म्हटले होते की, ‘भारत योग्य वेळी, योग्य ठिकाणी बदला घेईल.’

भविष्यातही चकमकी शक्य
चीन आणि पाकिस्तानशी भाविष्यात चकमकी होतील का, असा प्रश्न विचारला तेव्हा सिंग म्हणाले, चीनशी अशा चकमकींची शक्यता वाटत नाही. कारण, दोन्ही देशांकडे आधुनिक तंत्रज्ञान आहे. वरिष्ठ पातळीवर समजूतदारपणाही दिसून येतो. मात्र, पश्चिम सीमेवर हे चित्र नाही. (पाककडून) कायम गोळीबार सुरू असतो.