आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्मी स्थापणार 3 नव्या संस्था, अँटी टेरर ऑपरेशन्समध्येही असतील महिला कमांडो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : ट्रेनिंगदरम्यान महिला कमांडो - Divya Marathi
फाइल फोटो : ट्रेनिंगदरम्यान महिला कमांडो
नवी दिल्ली - देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. पहिला - नॅशनल सेक्युरिटी गार्ड्स (एनएसजी) आता अँटी टेरर ऑपरेशन्समध्ये महिला कमांडोंचे युनिट तैनात करेल. दुसरा - डिफेन्स मिनिस्ट्री स्पेस, सायबर स्पेस आणि सिक्रेट वॉरसाठी तीन स्पेशल युनिटस स्थापन केले जाणार आहेत. मिडिया रिपोर्ट्समध्ये हे दावे करण्यात आले आहेत.

1. काय म्हणाले एनएसजी चीफ?
एनएसजीने शुक्रवारी 31 वा स्थापना दिन साजरा केला. यावेळी एनएसजीचे महासंचालक आरसी. तायल म्हणाले की, महिला कमांडोही इतर कमांडोप्रमाणे सक्षम आहेत. त्यांना अँटि टेरर आणि अँटी हायजॅकिंग सारख्या महत्त्वाच्या ऑपरेशन्ससाठी तैनात करता येऊ शकते. तायल म्हणाले गुरदासपूर हल्ल्यादरम्यान पंजाब पोलिसांनी दहशतवाद्यांना चांगल्या पद्धतीने लढा दिला. त्यामुळे एनएसजी पाठवण्याचा निर्णय घेतला नाही. महिला कमांडोंना प्रशिक्षणाबरोबरच खऱ्या ऑपरेशनमध्ये सहभागी करून घेणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. 2004 पासून एनएसजीमध्ये महिला कमांडोंचा समावेश करण्यात आला होता. पण अद्याप त्यांना कोणत्याही अँटी टेरर ऑपरेशनसाठी तैनात करण्यात आले नाही.

2. युनिफाइड कमांड बनवण्याची तयारी
डिफेन्स मिनिस्ट्री स्पेस, सायबर स्पेस आणि सिक्रेट वॉरसाठी तीन स्पेशल युनिट बनवण्यात येणार आहेत. हा निर्णय देशासमोर उभी असलेली नवी आव्हाने पाहून घेण्यात आलेला आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार तिन्ही युनिट तयार व्हायला वेळ लागणार आहे. तोपर्यंत एक स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. आर्मीशी संबंधित सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे युनिट आर्मीचे एक टू स्टार जनरल असेल.

हे तीन युनिट्स तयार करणार
- डिफेन्स सायबर एजन्सी (डीसीए)
- डिफेन्स स्पेस एजन्सी (डीएसए)
- स्पेशल ऑपरेशन्स डिव्हीजन (एसओडी)

काय म्हणाले चीफ ऑफ स्टाफ?
मीडिया रिपोर्ट्सनुसार इंडियन एअरफोर्सचे चीफ एअर मार्शल अरूप राहा म्हणाले की, जोपर्यंत हे तिन्ही युनिट तयार केले जाणार नाही तोपर्यंत अंतर्गत व्यवस्था करण्यात येईल. राहा यांच्या मते तिन्ही ऑर्गनायझेशन्स तयार करण्यासाठी काही वर्षे लागू शकतात. सूत्रांच्या मते डिफेन्स मिनिस्ट्रीचे प्रयत्न लष्कर आणि संशोधन तसेच माहितीचे अपग्रेडेशन करण्याचे आहेत.

एसओडीची गरज काय?
तसे पाहता आर्मी नेव्ही आणि एअरपोर्सकडे त्यांचे स्वतंत्र ऑपरेशन्स युनिट आहेत. पण तरीही डिफेन्स मिनिस्ट्री एसओडी तयार करत आहे. त्याचे कारण डिफेन्स मिनिस्ट्रीला स्वतंत्र युनिट्सऐवजी एन नवीन सेंट्रल पूल बनवायचा आहे. म्हणजे युद्धाच्या स्थितीत त्याचा वापर करता येईल. त्यासाठी एक जॉइंट कमांड तयार केले जाईल.

भारताकडे दोन युनिफाइड कमांड्स
भारताकडे आधीपासूनच दोन युनिफाइड कमांड्स आहेत. 2001 मध्ये पहिली कमांड अंदमान आणि निकोबारमध्ये तयार करण्यात आले होते. 2003 मध्ये देशाचे न्यूक्लिअर वेपन्स हँडल करण्यासाठी दुसरे स्ट्रॅटेजिक कमांड तयार करण्यात आले होते.

बदलत्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयारी
सुत्रांच्या मते सध्या पारंपरिक युद्ध होत नाहीत. पण देशावर इतर प्रकारचे धोके आहेत. त्यात स्पेस आणि सायबर स्पेन याचा प्रामुख्याने समावेश आहे. या प्रकरणात भारतासमोर चीनपेक्षाही मोठे आव्हान आहे. चीनजवळ अँटी सॅटेलाइट सिस्टीमही आहे. डिफेंन्स मिनिस्ट्री त्याचा सामना करण्यासाठी प्रयत्न करत आहे. या तीन ऑर्गनायझेशन तयार करणे हे चीनचा निपटारा करण्याच्या धोरणाचा एक भाग आहे. व्हाइस अॅडमिरल गिरीश लुथरा यांच्या मते सध्या सायबर द्वारेच सर्व्हीलान्स आणि इंटेलिजन्ससारखी महत्त्वाची कामे केली जातात. त्यातून मिळालेल्या माहितीनुसारच मिलिट्री ऑपरेशनची तयारी केली जाते.