आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीची छेड काढणा-यांना विरोध करणा-या आर्मी जवानाची हत्‍या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- मेरठमध्‍ये मुलीची छेड काढणा-यांना विरोध करणा-या आर्मी जवानाला गुंडांनी बेधम मारहान करून हत्‍या केली. ही घटना गुरूवारी संध्‍याकाळी घडली आहे. आर्मी जवानाला गुंड मारहाण करीत होते त्‍यावेळी तेथे 150 पेक्षा अधिक लोक पाहत होते. परंतू एकही जवणाच्‍या मदतीला पुढे आले नाही.
लोखंडी रॉडने केली मारहाण
आर्मी जवान वेदमित्र दुध घेण्‍यासाठी जात होते. त्‍यावेळी काही गुंड मुलीची छेड काढीत होते. आर्मी जवान वेदमित्र त्‍यामुलीला वाचवण्‍यासाठी पुढे आले आणि गुंडांसोबत वादावादी सुरू झाली. काही वेळातच तेथे छेडकाढणा-यांचे मित्र आले आणि जवानाला लोखंडी रॉड, बेसबॉलच्‍या डंडयाने जबर मारहाण केली. जवानाला मेल असल्‍याच समजून सगळे गुंड तेथून निघून गेले. नंतर जवानाला रूग्‍णालयात उपचारासाठी आनण्‍यात आले मात्र तो पर्यंत जवानाचे प्राण गेले होते.