आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Army Jawan Viral Video 42nd Infantry Brigade Jawan Pratap Singh Video Message To PM Modi

BSF-CRPF नंतर आता लष्कराच्या जवानाचा व्हिडिओ व्हायरल, PMOला लिहिले होते पत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय सैनिकांचे एका नंतर एक व्हिडिओ समोर येत आहेत. त्यांना होणारा त्रास, सोयी-सुविधांचा आभाव यावर सैनिक नाराजी व्यक्त करत आहेत. आता लान्स नायक यज्ञप्रताप सिंह यांचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर छळवणुकीचा आरोप करत मोदींना पत्र लिहिले होते.
 
पीएमओकडून त्यांना चौकशीचे आश्वासन देण्यात आले. वास्तवात मात्र त्यांना कोर्ट मार्शलसाठी बोलावल्याचे ते व्हिडिओमध्ये सांगताना दिसतात. लान्सनायक सिंह यांना अधिकाऱ्यांचे बुट साफ करणे आणि त्यांचे कुत्रे फरवण्यास सांगितले जात होते, असे त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे.  सिंह यांच्या आधी जम्मू-काश्मीरमध्ये एलओसीवर तैनात तेजबहादूर यादव आणि सीआरपीएफ जवान जीतसिंह यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
 
डेहरादूनमध्ये तैनात आहे यज्ञप्रताप
- यज्ञप्रताप डेहरादून येथे 42 इनफन्ट्री ब्रिगेडमध्ये तैनात आहेत. त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार, जून 2016 मध्ये त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले होते. 
- यज्ञप्रताप म्हणतात, 'पंतप्रधान कार्यालयाच्या चौकशीच्या पत्रानंतर जणू भूकंप आला होता. या लोकांनी टॉर्चर करण्यास सुरुवात केली. माझ्यावर दबाव टाकला जाऊ लागला.'
- 'मला कोर्टमार्शलसाठी बोलावले गेले आहे. मला कळत नाही मी पत्र लिहून एवढा कोणता मोठी चूक केली.'
- 'माझ्याविरोधात चार्जशीट तयार करण्यासाठी अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली जात आहे. मी पत्रात फक्त सहायकांकडून अधिकाऱ्यांचे बुट पॉलिश, कुत्रे फिरविण्याचे काम बंद झाले पाहिजे एवढीच मागणी केली होती.'
- 'माझी देशातील नागरिकांना विनंती आहे की मी सव्वाशे कोटी लोकांपैकीच एक आहे. आधी मी नागरिक आहे नंतर सैनिक.'

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)