आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Army Running Out Of Ammunition War Waste Reserve Is Less Than 50 Percent

युद्ध झाले तर 20 दिवस पूरेल एवढाच शस्त्रसाठा, 50 टक्के शस्त्रास्त्रांची गरज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - चीननंतर जगातील क्रमांक दोनच्या भारतीय लष्कराच्या जवानांना शस्त्रास्त्रांची कमतरता सतावतेय. लष्कराने यावर मौन बाळगले आहे. एका इंग्रजी दैनिकातील वृत्तानुसार, जर घणघोर युद्धाला सुरुवात झाली तर, भारतीय सैन्य केवळ 20 दिवस आपल्या शस्त्रांस्त्रांवर तग धरू शकते. लष्कर आणि युद्धतज्ज्ञांनुसार, युद्धकाळात किमान 40 दिवस शस्त्रास्त्रांचा साठा राहील एवढी युद्धसामग्र सैन्याकडे असली पाहिजे.
लष्कर प्रमुख जनरल बिक्रमसिंग यांनी काही दिवासांपूर्वीच म्हटले होते, की शस्त्रास्त्रांसाठी योग्य बजेट मिळाले तर, 2015 पर्यंत 50 टक्के वॉर वेस्टे रिजर्व असले पाहिजे. याचाच अर्थ भारतीय लष्कराकडे अद्यापही 50 टक्के वॉर वेस्टे रिजर्व नाही. याचा अधिक विस्ताराने खुलासा करायचा झाल्यास, युद्ध काळात भारत कोणत्याही देशासमोर केवळ 20 दिवस आपल्या शस्त्रांसह लढू शकतो. ही परिस्थिती 2019 पर्यंत कायम राहाण्याची शक्यता आहे.

पुढील स्लाइडमध्ये, KNOWLEDGE: भारतीय लष्कारत काय काय आहेत कमतरता