आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉक्सिंगच्या सामन्यावरून लष्करी जवान-अधिका-यांमध्ये हाणामारी, चौकशीचे आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - संरक्षणासाठी जिवाची बाजी लावणा-या लष्करात आपसांतच जुंपल्याची घटना उत्तर प्रदेशात समोर आली आहे. जवान आणि अधिकारी यांच्यात झालेल्या गुद्दागुद्दीत दोन जण जखमी झाले. ही घटना जवानांतील बॉक्सिंग सामन्यादरम्यान घडल्याचे सांगण्यात आले.


गुरुवारी सायंकाळी 10 शीख लाइट इन्फंट्री रेजिमेंटमध्ये लष्करी तुकडी पातळीवर बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. लष्कराचे हे तळ उत्तर प्रदेशातील मेरठजवळील दोभोतुआ गावात आहे. बॉक्सिंग सुरू असताना हा प्रकार घडला. लष्कराच्या अंतर्गत संघर्षात एक लेफ्टनंट कर्नलसह अन्य एक अधिकारीदेखील जखमी झाले. लष्करप्रमुख विक्रम सिंह यांनी शुक्रवारच्या घटनेची गंभीर दखल घेतली असून त्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयामार्फत ही चौकशी होईल. दोषींवर कोणतीही सहानुभूती न दाखवता शिस्तभंगाची कडक कारवाई होणार आहे.


दरम्यान, गेल्या दोन वर्षांत जवान आणि लष्करी अधिकारी यांच्यातील संघर्षाच्या घटना वाढल्या आहेत. पूर्वीदेखील जवान-अधिका-यांतील संघर्षाच्या अनेक घटना उजेडात आल्या होत्या. यात अनेक जवानांवर गेल्या वर्षी कारवाईदेखील झाली होती.