आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोखरणमध्ये अमेरिकी हॉवित्झर तोफांची टेस्टिंग सुरू, 25 km पर्यंत भेदतात अचूक लक्ष्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय लष्कराने दोन अल्ट्रालाइट हॉवित्झर तोफांची टेस्टिंग राजस्थानच्या पोखरण रेंजमध्ये सुरू केली आहे. अमेरिकेकडून खरेदी केलेल्या या तोफा 25 km पर्यंत अचूक निशाणा लावून शत्रूना जमीनदोस्त करू शकतात. रविवारी लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सप्टेंबरपर्यंत या तोफांची टेस्टिंग सुरू राहील. पुढच्या वर्षीच्या सप्टेंबरपर्यंत आणखी तीन तोफा लष्कराला मिळतील. भारताने गतवर्षी अमेरिकेशी 4800 कोटी रुपयांचा 145 हॉवित्झर तोफांचा करार केला होता. बोफोर्स घोटाळ्याच्या 30 वर्षांनंतर एखादी विदेशी तोफ भारतीय लष्कराला मिळाली आहे.
 
कुठे होईल तैनात?
- सूत्रांनुसार, भारतीय लष्कर हॉवित्झर तोफांना जास्त उंचीवर असणाऱ्या चीनला लागून असलेल्या सीमेवर (अरुणाचल प्रदेश आणि लडाख) तैनात करेल.
- अमेरिकेने 2 तोफा भारतात पाठवल्या आहेत. उर्वरित 23 भारतात महिंद्रा कंपनीच्या मदतीने असेम्बल आणि टेस्ट केल्या जातील. वजन आणि मारक क्षमतेच्या बाबतीत जगात सर्वात उत्तम ही तोफ आहे. अमेरिकेने ही तोफ कॅनडा आणि ऑस्ट्रेलियानंतर भारताला विकली आहे. 2007 पासून आतापर्यंत भारत आणि अमेरिकेदरम्यान 13 बिलियन डॉलरचा शस्त्रास्त्र करार झालेला आहे.
बातम्या आणखी आहेत...