आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मिरात होणार 10 हजार पोलिस अधिकाऱ्यांची भरती; युवकांचा विश्वास जिंकणार मोदी सरकार -गृहमंत्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने काश्मिरी युवकांना विश्वासात घेण्यासाठी आणि फुटिरतावाद्यांपासून दूर ठेवण्यासाठी एक मोहिम छेडली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून सरकार काश्मिरात 10 हजार विशेष पोलिस अधिकाऱ्यांची भरती करणार आहे. यामुळे, सैनिकांना दहशतवाद्यांवर अंकुश ठेवण्यात सुद्धा मदत मिळेल. यासोबतच, नक्षलग्रस्त भागांमध्ये सुद्धा मोदी सरकार स्थानिक पोलिसांना लष्कराकडून प्रशिक्षण दिले जात आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी यासंदर्भातील माहिती दिली. 
 
युवकांपर्यंत पोहचण्याचे धोरण
मोदी सरकारला 3 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एका अनौपचारिक पत्रकार परिषदेत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सरकारच्या धोरणांबद्दल माहिती दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, सरकार काश्मिर प्रश्नावर कायमचा तोडगा काढणार आहे. सरकारने याच दिशेने काम सुरू केले आहे. काश्मिरात येत्या काही दिवसांत 10 हजार विशेष पोलिस अधिकाऱ्यांची भरती केली जाणार आहे. या अधिकाऱ्यांमध्ये स्थानिक युवकांनाच प्राधान्य दिले जाईल. यामुळे, दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी लष्कराला मदत होणारच, यासोबतच काश्मिरी युवक फुटिरतावाद्यांपासून दूर राहतील. 
 
काश्मिरात अशांततेसाठी कट्टरवाद जबाबदार
काश्मिरी युवकांच्या मनावर कट्टरवाद बिंबवण्यासाठी दिल्या जाणारी भडकाऊ भाषणे आणि त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न ह्याच गोष्टी प्रामुख्याने राज्यातील अस्थिरतेसाठी जबाबदार आहे. जगभरात कट्टरतावाद वाढत असला तरीही इतर देशांच्या तुलनेत भारतात कट्टरवादाचा तेवढा परिणाम झालेला नाही. 
 
नक्षल्यांविरोधात प्रशिक्षण
नक्षलग्रस्त राज्यांमध्ये स्थानिक पोलिसांना मोदी सरकार लष्करी प्रशिक्षण देत आहे. जेणेकरून स्थानिक पोलिसांना नक्षल्यांचा सामना अधिक प्रभावीपणे करता येईल. याच मोहिमेत छत्तिसगड पोलिस दलातील 1500 कर्मचाऱ्यांना लष्करी प्रशिक्षण देण्यात आले आहे. लवकरच आणखी 3000 पोलिसांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...