आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arun Jaitley And Gulam Nami Azad News In Marathi

अरुण जेटली, आझादांकडे राज्यसभेचे पक्षनेतेपद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अर्थमंत्री अरुण जेटली यांची सोमवारी राज्यसभेच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड जाहीर करण्यात आली. लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्या अधिवेशनात राज्यसभेचे अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी दोन्ही पदांची घोषणा केली. संसदीय कामकाजमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी अन्सारी यांना 2 जून रोजी दिलेल्या पत्रात जेटली यांची नियुक्ती केल्याचे नमूद केले होते. काँग्रेस नेत्याने रविवारी दिलेल्या पत्रात आझाद यांची काँग्रेसच्या नेतेपदी निवड केल्याचे म्हटले आहे. 15 व्या लोकसभेमध्ये जेटली राज्यसभेतील विरोधी पक्षनेते होते, तर आझाद केंद्रीय आरोग्यमंत्री होते. विशेष म्हणजे जेटली आणि आझाद यांचा अनुक्रमे अमृतसर आणि उधमपूर मतदारसंघातून पराभव झाला होता. दोघांचाही सदस्यत्वाचा कार्यकाळ अद्याप शिल्लक आहे.