आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arun Jaitley And Rajnath Singh Signal United Front In Solidarity With Sushma Swaraj

सुषमांची नियत चांगली, सरकार त्यांच्यासोबतच;अरुण जेटली, राजनाथ यांची ग्वाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मनीलाँडरिंगच्या आरोपांचा सामना करत असलेल्या ललित मोदींना मदत केरून वादात अडकलेल्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना वाचवण्यासाठी केंद्र सरकार सक्रिय आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या मुद्द्यावर चुप्पी तोडताना म्हणाले, ‘त्यांच्यावर (सुषमा) लागलेले आरोप निराधार आहेत.

सुषमा यांनी चांगल्या भावनेने हे पाऊल उचलले होते यात कुठलाही संशय नाही. संपूर्ण सरकारच त्यांच्यासोबत आहे.’सुषमा यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पक्षाने सलग दुसऱ्या दिवशीही निदर्शने केली. मंगळवारी गृहमंत्री राजनाथ सिंह आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकारांशी काश्मीर पुरावरील पॅकेजबाबत चर्चा केली. पण त्यावेळी सुषमांचा मुद्दाच प्रामुख्याने उपस्थित झाला. दोन्ही नेत्यांनाही तसे होणार याची माहिती होती. त्यामुळे पत्रकार परिषदेच्या आधी राजनाथ यांनी आपल्या कार्यालयात जेटली आणि स्वराज यांच्याशी तासभर चर्चा केली.
मंत्रीचघेतात निर्णय, जबाबदारी संपूर्ण सरकारची : निर्णयसुषमा यांचा होता की संपूर्ण सरकारचा, या प्रश्नावर जेटली म्हणाले, ‘सरकारचे मंत्री निर्णय घेण्यास सक्षम आहेत. ते जो निर्णय घेतात त्याची सामूहिक जबाबदारी सरकारची असते.’
अस्तनीतीलनिखारा कोण? जेटली म्हणाले, पुढचा प्रश्न विचारा :
सुषमायांच्या विरोधात भाजपतील ‘अस्तनीतील निखाऱ्या’ने कट रचल्याचा आरोप भाजप खासदार कीर्ती आझाद यांनी ट्विटद्वारे केला होता. याबाबत जेटली यांना ‘अस्तनीतील साप’ कोण, अशी विचारणा केली असता त्यांनी स्मितहास्य केले. उत्तर देताच ते म्हणाले, ‘पुढचा प्रश्न विचारा.’ हे प्रकरण समोर आल्यापासून जेटली चूप होते.

पंतप्रधानांनी खुलासा करावा : सेना
‘सामना’च्या अग्रलेखात सुषमा स्वराज यांचा बचाव केला आहे. त्यात म्हटले आहे, काँग्रेस निर्जीव आहे. पक्षाच्या प्रतिक्रियेला फार अर्थ नाही. सुषमा यांच्या ३५-४० वर्षांच्या स्वच्छ कारकीर्दीवर कोण चिखलफेक करत आहे हे शोधण्यासाठी पंतप्रधानांनीच पुढाकार घ्यावा. सुषमांभोवती वादाचे ढग निर्माण करून त्यांना भाजपमधून अपदस्थ करण्याचा राजकीय कट आहे.

ज्या सर्जरीसाठी मदत केली, ती झालीच नाही : काँग्रेस
दुसरीकडे काँग्रेसने सरकारवर दबाव टाकण्याची एकही संधी सोडायची नाही, असे ठरवल्याचे दिसते. काँग्रेसचे प्रवक्ता आनंद शर्मा पक्षाच्या विशेष ब्रीफिंगमध्ये म्हणाले, ‘या प्रकरणात सुषमा स्वराजच नाही, तर संपूर्ण सरकारच सहभागी आहे. कायद्यापासून पळ काढणाऱ्या ललित मोदीला सामूहिक रूपाने मदत करण्यात आली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीखाली व्यापक चौकशी झाली पाहिजे. ज्या शस्त्रक्रियेच्या बहाण्याने ललित मोदींची मदत करण्यात आली नाही ती तर झालीच नाही.’ हे महत्त्वाचे आहे. कारण सुषमांच्या दाव्यानुसार, मोदींच्या पत्नीची शस्त्रक्रिया होती. त्यामुळे मानवीय आधारावर त्यांना मदत करण्यात आली होती.