आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रावरील टीकेपेक्षा काँग्रेसला सल्ला द्या, जेटलींचा मनमोहन यांच्यावर पलटवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मोदी सरकारवर केलेल्या टीकेने भडकलेले अर्थमंत्री अरुण जेटली यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर पलटवार केला आहे. ते म्हणाले, यूपीए सरकारच्या धोरणांना जणू अर्धांगवायू झाला होता. एनडीएच्या कार्यकाळात देशाचा जगात दबदबा निर्माण होत आहे. यूपीएच्या काळात २४ अकबर मार्गावरील काँग्रेस मुख्यालयात धोरणे आखली जात होती. एनडीए सरकारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णय अंतिम असतो.
माजी पंतप्रधानांनी विद्यमान सरकारवर टीका करण्यापेक्षा काँग्रेसला सल्ला दिल्यास चांगले होईल, असे जेटली यांनी म्हटले आहे. मनमोहन सिंग यांनी एका प्रसारमाध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीत मोदी सरकारवर अनेक मुद्द्यांवर टीका केली होती. जेटलींनी शनिवारी फेसबुकवरून त्याला उत्तर दिले. आपल्या ब्लाॅगवर ते म्हणाले, माजी राष्ट्रपती आणि माजी पंतप्रधान महत्त्वाच्या प्रसंगी कमी बोलतात. ते बोलतात तेव्हा देशाने त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकायला हवे. ते देशाच्या बुद्धिमत्तेचे प्रतीक आहेत. त्यांनी गटबाजीच्या भावनेतून बाहेर पडून आपल्या पक्षाला राष्ट्रहिताच्या कार्यात काम करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. दरम्यान, अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी आवश्यक पावले उचलण्यात आली नाहीत, असे मनमोहन सिंगांनी म्हटले होते.