आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arun Jaitley Debates Over Price Rise In Parliament

रेल्वे-इंधन-कांदे-बटाटे भाववढ \'यूपीए\'ची देण, अर्थमंत्र्यांनी कॉंग्रेसवर खापर फोडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी राज्यसभेत महागाईवरील प्रश्नांना उत्तर देताना रेल्वे भाडेवाढ आणि इंधन दरवाढीचे खापर यूपीए सरकारवर फोडले आहे. जेटली म्हणाले, 'यूपीए सरकारने रेल्वे भाडे वाढवण्याचे टाळले होते. जर आता रेल्वे भाडे वाढवले नसते तर रेल्वेचा चक्का जाम झाला असता. यूपीए सरकार कठोर निर्णय घेण्यास घाबरत होते. त्यामुळे रेल्वेचा तोटा वाढत होता. यूपीएने लोकसभा निवडणुकीमुळे रेल्वे भाडे वाढवले नव्हते. रेल्वे प्रशासनाने फेब्रुवारीमध्ये सरकारला भाडे वाढवण्याचे सांगितले होते. त्यामुळे आता झालेली भाडेवाढ ही यूपीए सरकारची देण आहे.' जेटली म्हणाले, 'आम्ही काय करणार आहोत हे उद्या कळेल.'
पेट्रोल - डिझेलच्या किंमतीवर काय म्हणाले अर्थमंत्री
जेटली म्हणाले, 'डिझेल संबंधी यूपीए सरकारचे धोरण होते, की दर महिन्याला पन्नास पैसे दरवाढ करायची. मात्र निवडणुकीमुळे दोन महिने दरवाढ झाली नव्हती. आमच्या सरकारने हा बॅकलॉग भरून काढत दरवाढ केली. इराकमधील परिस्थितीमुळे क्रूड ऑइलच्या दरात अचानक वाढ झाली त्यामुळे सरकारला इंधन दरवाढ करावी लागली आहे.'
कांदे-बटाटे महागाईवरही दिले मंत्र्यांनी उत्तर
गेल्या दोन वर्षात ज्या वस्तूंची सर्वाधिक भाववाढ झाली त्यात कांदे आणि बटाटे आहेत. यूपीए सरकार भाववाढ झाल्यानंतर जागी होत होते. मात्र, आम्ही किंमती थोड्या वाढायला लागल्याबरोबर निर्यात मुल्य निर्धारित केले आणि साठ्यांवर नजर ठेवण्यास सुरवात केली. त्यासोबतच प्रत्येक राज्यांना साठेबाजांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.