आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arun Jaitley News In Marathi, Finance Minister, Divya Marathi

अरूण जेटली म्हणाले, निर्भया अत्याचार ही तर क्षुल्लक घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ‘दिल्लीतील अत्याचाराच्या एका क्षुल्लक घटनेमुळे देशातील पर्यटनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे,’असे वादग्रस्त वक्तव्य अर्थ आणि संरक्षणमंत्री
अरुण जेटली यांनी केले आहे. दिल्लीत गुरुवारी राज्यांच्या पर्यटनमंत्र्यांच्या अधिवेशनात केलेल्या या वक्तव्यावरून टीकेची चांगलीच झोड उठल्यानंतर जेटलींनी खेद व्यक्त केला.
दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ ला २३ वर्षीय निर्भयावर धावत्या बसमध्ये सामूहिक अत्याचार झाला होता. घटनेनंतर १३ दिवसांनी सिंगापूरमध्ये तिचा मृत्यू झाला होता.
जेटलींच्या या वादग्रस्त वक्तव्यावरून चांगलेच राजकीय वादंग माजले. कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी जेटलींच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना रोखले.टीकेची झोड उठल्यानंतर जेटलींनी खेद व्यक्त केला . ‘माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला, असे जेटली म्हणाले.

मोदीजी, अत्याचाराच्या घटनांमुळे देशाची मान लाजेने झुकते, असे तुम्ही म्हणाला होता. जेटली यांच्या वक्तव्यामुळे तुम्हाला लाज वाटते का? मनीष शिसोदिया, आपचे नेते (ट्विट)