नवी दिल्ली - अर्थमंत्री अरुण जेटली यांचे गेल्या तीन आठवड्यात १७ किलो वजन कमी झाले आहे. जेटली हे मधुमेहाचे रुग्ण असून काही दिवसांपूर्वी त्यांची गॅस्ट्रिक बायपास सर्जरी करण्यात आली होती. ६१ वर्षीय जेटली शस्त्रक्रियेनंतरच्या तपासणीसाठी मंगळवारी रुग्णालयात दाखल झाले. बुधवारी ते घरी परततील.
शस्त्रक्रिया झाल्यानंतर तीन आठवड्यांत त्यांचे १७ किलो वजन कमी झाले असून मधुमेहदेखील नियंत्रणात आहे. इन्सुलिन तसेच इतर औषधांचे प्रमाणही कमी झाले आहे. मॅक्स हेल्थकेअरचे कार्यकारी उपाध्यक्ष डॉ. प्रदीप के. चौबे यांनी ही माहिती दिली.