आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिजिटल पेमेंटवर सुटच सुट, वाचा तुम्हाला याचा कसा होईल फायदा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली : नोटबंदीला एक महिना पूर्ण झाल्यावर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी कॅशलेस व्यवहाराला चालना देण्यासाठी ११ उपाययोजनांची घोषणा केली. सरकारी कंपन्यांच्या पेट्रोल पंपांवर डेबिट/ क्रेडिट कार्ड किंवा मोबाइल/ ई-वॉलेटद्वारे पेमेंट केल्यास बिलात ०.७५ टक्के सूट मिळेल. दोन हजार रुपयांपर्यंतच्या कार्ड पेमेंटवर सेवा कर लागणार नाही. सध्या डेबिट/ क्रेडिट कार्डद्वारे ७०% पेमेंट २००० रुपयांपर्यंतचे असतात.

सरकारी विमा कंपन्यांच्या पोर्टलवरून नवीन पॉलिसी घेतल्यास ८ ते १०% सूट मिळेल. ऑनलाइन रेल्वे तिकीट, सीझनल तिकीट व रेल्वे खानपान सेवांचे डिजिटल पेमेंट केल्यासही सवलती घोषित करण्यात आल्या आहेत. या सवलतींचा बोजा संबंधित विभाग किंवा कंपन्या उचलणार आहेत.
जेटली म्हणाले, नोटबंदीनंतर लोक झपाट्याने डिजिटल अर्थव्यवस्थेकडे वळत आहेत, असा फीडबॅक आहे. बँकांत जमा ५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटांबाबत ते म्हणाले की, पैसे जमा झाले म्हणजे काळा पैसा पांढरा झाला असे नव्हे. बेहिशेबी रकमेवर कर द्यावाच लागेल. विशेष म्हणजे सरकारने १५.४४ लाख कोटी रुपयांच्या जुन्या नोटा रद्द केल्या. त्यापैकी ११.८५ लाख कोटींच्या नोटा एक महिन्यात जमा झाल्या.
पुढील स्लाईडवर वाच.... अर्थमंत्री जेटलींचे निर्णय व त्याचे होणारे परिणाम असे... असा मिळवा डिजिटल पेमेंटचा लाभ....
बातम्या आणखी आहेत...