आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arun Jaitley Rakes Up Sonia Gandhi's Origin To Counter 'outsider' Barb News In Marathi

जेटली म्हणाले : मी बाहेरून आलो, तर सोनिया कोणत्या प्रदेशातल्या?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृतसर/ नवी दिल्ली - अमृतसरमधील भाजप आणि काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांमधील शाब्दिक चकमक तीव्र होऊ लागली आहे. भाजप नेते अरुण जेटली यांनी त्यांना अमृतसरमध्ये ‘बाहेर’चा असल्याचा उल्लेख केल्याबद्दल काँग्रेस नेते अमरिंदर सिंह यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. त्यांच्या पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी कोणत्या प्रदेशातील आहेत? असा सवाल जेटली यांनी केला आहे.

‘पंजाबशी माझे बापजाद्यापासूनचे संबंध आहेत, तरीही कॅप्टन (अमरिन्दर) साहेबांनी मला ‘बाहेर’चा आणि ‘नकली पंजाबी’ म्हटले आहे. सोनिया गांधी (काँग्रेसच्या अध्यक्षा )भारतातील कोणत्या प्रदेशातील आहेत? हे कृपया त्यांनी मला सांगावे’, असे जेटली यांनी त्यांच्या वेबसाइटवर लिहिले आहे. निवडणूक जिंकल्यानंतर अमृतसरमध्ये माझे घर आणि कार्यालय दोन्ही राहणार आहे.परंतु ते (अमरिन्दर) अमृतसरच्या लोकांसाठी उपलब्ध असणार आहेत काय? सर्वसामान्य लोकांचे तर सोडाच पण त्यांच्या पक्षाचे नेते आणि त्यांच्याच मंत्र्यांनाही त्यांच्याशी संपर्क साधणे कठीण आहे, असे अनुभव सांगतो. ते काही तासांसाठीच उपलब्ध असतात. त्यांचा महालाची दारे सर्वसामान्य लोकांसाठी नेहमीच बंद राहिली आहेत’, असे जेटली यांनी म्हटले आहे.

अमरिंदर सिंगांचा पलटवार : सूनच वारसा पुढे चालवते
वादाची सुरुवात झाली होती कॅप्टन अमरिंद सिंग यांच्यापासून. निवडणूक जिंकल्यानंतर ते (अरुण जेटली) अमृतसरमध्ये राहतील का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. मग या वादात जेटली यांनी सोनियांना ओढल्यामुळे अमरिंदर नाराजही झाले. त्यांनी कुटुंबाचा वारसा सूनच पुढे चालवणार्‍या भारतीय संस्कृतीची आठवण त्यांनी जेटलींना करून दिली.