आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुखवर थेट हल्ला टाळत अरुण जेटली म्हणाले - कुठे आहे असहिष्णुता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी मंगळवारी म्हटले, की देशात सगळीकडे शांतता आणि सद्भाव आहे. काँग्रेस आणि त्यांचे सहकारी फक्त राजकीय लाभासाठी बळजबरीने असहिष्णुतेचा मुद्दा उपस्थित करत आहेत. अभिनेता शाहरुख खानने देशात असहिष्णुता वाढली असल्याचे म्हटल्या नंतर केंद्रीय मंत्री जेटली म्हणाले, जर कोणी असे म्हणत असेल की असहिष्णुता असू नये, तर त्यात काय चूकीचे आहे ? त्याच वेळी 'पुरस्कार वापसी'च्या वारीतील साहित्यिक आणि चित्रपट निर्मात्यांबद्ददल जेटली म्हणाले, 'त्यांना हे पुरस्कार सरकारने दिले नाही. लोकांच्या संस्थांनी त्यांना पुरस्कृत केले आहे. त्यामुळे असहिष्णुतेच्या नावाने पुरस्कार परत करणे योग्य नाही.'

साहित्यिक-कलाकारांना काँग्रेसची साथ
देशातली असहिष्णू वातावरणाविरोधात मंगळवारी काँग्रेसने संसद भवन ते राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढला. या मोर्चाचे नेृतृत्व सोनिया गांधींनी केले. मोर्चामध्ये माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते सहभागी झाले होते.
शाहरुख म्हणाला, पुरस्कार परत करणार नाही
शाहरुखने वाढदिवसानिमित्त दिलेल्या मुलाखतीत विविध वादग्रस्त मुद्द्यांवर विचार व्यक्त केले. बीफ वादाशी संबंधित प्रश्नावर तो म्हणाला, ‘मांसाहाराच्या सवयीवरून धर्म ठरू शकत नाही. देशात अजूनही असहिष्णुता आहेच. या मुद्द्यावर जे लोक पुरस्कार परत करत आहेत, मी त्यांच्याबरोबरच आहे. मात्र मी पुरस्कार परत करणार नाही.’
जेटलींनी काँग्रेसवर साधला निशाणा
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासंदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेत जेटली पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देत होते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने राष्ट्रपती प्रणव मुखर्जींची सोमवारी भेट घेतली. त्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर जेटली म्हणाले, 'देशात शांतता आणि सद्भावाचे वातावरण आहे. भारत कधीही असहिष्णू नव्हता आणि होणारही नाही. भारत उदार लोकशाहीवादी देश आहे. केवळ वेगवेगळी विधाने करुन देशात असहिष्णू वातावरण निर्माण होणार नाही.' अखेर त्यांनी कुठे आहे असहिष्णुता? असा उलट सवाल पत्रकारांना केला.

असहिष्णुतेवर आरोप-प्रत्यारोप
सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमधील निवडणूक प्रचारसभेत काँग्रेसला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत विचारले होते, ज्या काँग्रेसवर 1984 च्या शीखविरोधी दंगलीचा आरोप आहे, आज ते सहिष्णुतेवर बोलत आहेत. त्यानंतर काँग्रेसने मोदींवर पलटवार केला होता. म्हटले होते, गुजरातमधील 2002 च्या दंगलींसाठी मोदींनी माफी मागितली होती का?
काय आहे वाद
>> गोमांस असल्याच्या संशयावरुन उत्तर प्रदेशातील दादरीमध्ये एका व्यक्तीची ठेचून हत्या करण्यात आली. कन्नड लेखक कलबुर्गी यांच्या हत्येच्या निषेधार्थ साहित्यिकांनी पुरस्कार परत केले. त्याआधी महाराष्ट्रात कॉम्रेड पानसरेंचा खून करण्यात आला.
>> 40 हून अधिक साहित्यिकांनी साहित्य अकादमी पुरस्कार परत केले.
>> 13 इतिहासकार आणि काही शास्त्रज्ञांनी राष्ट्रीय पुरस्कार परत केले.
>> दिबाकर बॅनर्जींसारख्या 10 चित्रपट निर्मात्यांनी त्यांचे पुरस्कार परत केले.
>> एक दिवस आधीच प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमींनी म्हटले होते, देशात इन्टॉलरेंस वाढला आहे. आपल्या सर्वांना प्रतिकात्मक रित्या आपले पुरस्कार परत केले पाहिजे.
>> दुसरीकडे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी याच मुद्यावर सोमवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींची भेट घेतली.
पुढील स्लाइडमध्ये, ओबामाही म्हटले होते भारतात असहिष्णुता वाढली
बातम्या आणखी आहेत...