आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arun Jaitley Tells Court, I Did Not Receive Any Money From Anybody

डीडीसीएचा अध्यक्ष म्हणून एक रुपयाही घेतला नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मंगळवारी िदल्लीच्या पतियाळा हाऊस न्यायालयात व्यक्तिश: हजर राहत जबाब नोंदवला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आपच्या इतर पाच नेत्यांविराेधात जेटली यांनी बदनामीचा खटला दाखल केला आहे. त्याप्रकरणी जबाब नोंदवताना जेटलींनी त्यांची बाजू मांडली. त्यात त्यांनी म्हटले की, " त्या लोकांचे (आप नेते) म्हणणे असे की, डीडीसीएचा अध्यक्ष या नात्याने फिरोजशहा कोटला स्टेडियमच्या फेरउभारणीसाठी मी पैसे घेतले आहेत. हा आरोप पूर्णपणे चुकीचा अाहे.

कुणाकडूनही एक रुपयादेखील घेतलेला नाही.'
न्यायालयात जेटलींचा जबाब नोंदवण्याची कार्यवाही सुमारे ७० मिनिटे चालली. जेटलींसोबत त्यांचे साक्षीदार म्हणून ज्येष्ठ पत्रकार रजत शर्मा यांनीही जबाब नोंदवला आहे. जेटलींनी केजरीवाल यांच्यासह आपचे पाच नेते कुमार विश्वास, आशुतोष, संजय सिंह, राघव चढ्ढा दीपक वाजपेयी यांच्या विरोधात जबाब दिला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, "या लोकांनी माझ्या माझ्या कुटुंबीयांच्या विरोधात खोटी अपमानजनक विधाने केली आहे.’

टि्वटर फेसबुक पोस्टचा हवाला
जेटलीयांनी केजरीवाल अन्य नेत्यांनी केलेले टि्वट फेसबुक पोस्टचा हवाला दिला आहे. त्यांनी म्हटले की, "त्यांच्या खोट्या वक्तव्यांमुळे लोकांनी माझ्यावर अनेक प्रतिकूल मते नोंदवली आहे. जनतेच्या दृष्टीने माझी प्रतिमा मलीन झाली आहे.'