आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जेटलींची संपत्ती २.८३ कोटी रुपयांनी घटली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची संपत्ती २०१५-१६ या आर्थिक वर्षात २.८३ कोटी रुपयांनी कमी झाली आहे. बँक खात्यांमध्ये रोख कमी झाल्यामुळे त्यांची संपत्ती ६९.१३ कोटी रुपयांवर आली आहे.

जेटलींनी २०१५-१६ आर्थिक वर्षातील संपत्ती आणि दायित्व जाहीर केले असून ते पीएमओ वेबसाइटवर टाकण्यात आले आहे. २०१४-१५ च्या तुलनेत निवासी इमारत आणि जमिनीसह अचल संपत्तीची किंमत ३५.२१ कोटी स्थिर राहिली, असे जेटलींनी म्हटले आहे. ३१ मार्च २०१५ अखेरीस जेटलींच्या चार बँक खात्यात ३.५२ कोटी जमा रक्कम घटून कोटींवर आली. इन्प्रो ऑइल्स लि. आणि डीसीएम श्रीराम कन्सोलिडेटेड लि. मध्ये त्यांच्या १७ कोटींच्या ठेवी असून त्यात कोणताही बदल झालेला नाही. मार्च २०१५ मध्ये त्यांच्याकडे ९५.३५ लाख रुपये रोख रक्कम होती, ती कमी होऊन ६५.२९ लाखांवर आली आहे. पीपीएफ आणि इतर गंुतवणूक मिळवून ही रक्कम ११ कोटींवर आली आहे. एक वर्षापूर्वी ती ११.२४ कोटी होती. जेटलींकडे असलेल्या सोने, चांदी आणि हिऱ्याची किंमत मार्च २०१६ मध्ये वाढून १.८६ कोटी रुपये झाली आहे.

पत्नीने जेटलींकडून घेतले ९.२२ कोटींचे कर्ज : जेटलींच्या पत्नी संगीतांवर ९.७१ कोटी कर्ज आहे. त्यापैकी ९.२२ कोटी कर्ज त्यांनी पतीकडून घेतले, तर ४९.२५ लाख रुपयांचे दुसरे कर्ज मुलगी सोनाली जेटलीकडून घेतले.
बातम्या आणखी आहेत...