आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘ब्लॅक मनी’ची संपूर्ण माहितीच मागवणार - जेटली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - स्विस बँकांमध्ये जमा असलेल्या भारतीयांच्या काळ्या पैशाबाबत केंद्र सरकारकडे सध्या कुठलीही माहिती नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी स्पष्ट केले. ‘काळा पैसा परत आणण्यासंदर्भात स्वित्झर्लंडच्या सरकारने कोणतीही माहिती दिलेली नाही, पण आम्ही स्विस बँकांना पत्र लिहून खातेधारकांची नावेच तसेच खात्यांचा सविस्तर तपशील मागवणार आहोत. स्विस सरकार मदत करेल, असा विश्वास जेटली यांनी व्यक्त केला.

ज्यांनी स्विस बँकांमध्ये काळा पैसा जमा केला आहे अशा भारतीयांची यादी स्विस सरकारने तयार केल्याचे वृत्त रविवारी आले होते. याबाबतचा संपूर्ण तपशील भारत सरकारला देण्यात येईल, असे एका अधिकार्‍याने सांगितले होते. स्विस सरकारने विविध बँकांत ठेवलेल्या पैशाच्या लाभार्थींची ओळख पटवण्यासाठी चौकशी केली होती. त्यात अनेक भारतीय व्यक्ती, कंपन्यांची नावे समोर आली होती. गोपनीयता कायदा आणि माहितीच्या देवाण-घेवाणीचा द्विपक्षीय करार यांचा हवाला देऊन या अधिकार्‍याने काळा पैसा धारकांचा तपशील देण्यास नकार दिला होता. मात्र स्विस सरकार नव्या सरकारसोबत काम करण्यास तयार आहे, असे अधिकार्‍याने स्पष्ट केले होते. या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना जेटली म्हणाले की, स्विस सरकारकडील माहिती त्वरित मिळावी म्हणून आम्ही आजच (सोमवारी) स्विस सरकारला पत्र लिहीत आहोत.

बँकांनी एसआयटीला माहिती द्यावी: आरबीआय
काळ्या पैशाच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकाला (एसआयटी) सर्व माहिती द्यावी, अशी सूचना रिझर्व्ह बँकेने देशातील सर्व बँका आणि आर्थिक संस्थांना केली आहे. याबाबत बँकेने सोमवारी आदेश जारी केला.