नवी दिल्ली - माजी केंद्रीय मंत्री तथा प्रसिद्ध पत्रकार अरुण शौरी यांनी पंतप्रधान
नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कामाच्या शैलीवर प्रश्न उपस्थित केला आहे. सध्या मोदी,
अमित शहा आणि अरुण जेटली हे त्रिकूटच भाजपला चालवू लागले आहे, असा आरोप शौरी यांनी केला आहे.
मोदी यांना देशाची अर्थव्यवस्था योग्यरीतीने सांभाळता येत नाही. विकासदर १० टक्क्यांवर नेण्याचे आश्वासन म्हणजे एक अतिशयोक्तीच आहे. केवळ दावे केले जात आहेत. मीडियातून मथळे रंगवण्याचे काम केले जात आहे. एका टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शौरी यांनी हे आरोप केले आहेत. ते वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय मंत्रिपदावर होते.
सूटवरूनही आरोप : अमेरिकेचेराष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांच्या दौऱ्यादरम्यान मोदी यांनी विशिष्ट सूट परिधान केला होता. मोदींनी हा सूट का स्वीकारला, हे माझ्यासाठी अजूनही कोडेच आहे. गांधींचे नाव घेऊन अशा गोष्टी करू नयेत.