आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arun Shourie Targets Function Of Narendra Modi Govt

अरुण शौरींचा मोदींवर हल्लाबोल, म्हणाले- आर्थिक योजनांवर नव्हे पब्लिसिटीवर जोर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- माजी केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ पत्रकार अरुण शौरी यांनी नरेंद्र मोदी सरकारवर टिकास्त्र सोडले असून आर्थिक योजना दिशाहिन असल्याचा घणाघाती आरोप केला आहे. भाजप आणि केंद्र सरकारमधील निर्णय प्रक्रियेवर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची मक्तेदारी आहे, असेही ते म्हणाले आहेत.
नरेंद्र मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाचे अरुण शौरी यांनी कौतुक केले आहे. पण दुसरीकडे आर्थिक नितींवर जोरदार हल्ला चढवला आहे. अर्थव्यवस्थेच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न करण्यात येत नसून किरकोळ बाबींवर जास्त भर दिला जात आहे, असेही शौरी म्हणाले. सरकारची निर्णय प्रक्रिया पंतप्रधान कार्यालयात एकवटण्यात आली आहे. परंतु, या कार्यालयात या निर्णयांसाठी लागणारी कुवत आणि टॅलेंट नसल्याचेही शौरी म्हणाले. सेंट्रल इंन्फॉरमेशन कमिशन आणि सेंट्रल व्हिजिलंस कमिशन सारख्या संस्थांच्या कामांमध्ये अडथळे आणले जात आहेत, असेही ते म्हणाले आहेत.
शौरी म्हणाले, की नरेंद्र मोदी सध्या फार शांत आहेत. सध्या केवळ ट्विट करण्यात त्यांचा वेळ जातोय. लव्ह जिहाद आणि घर वापसी सारख्या मुद्द्यांवर त्यांनी भूमिका घ्यायला हवी. देशातील शांततेसाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी अशा प्रकारच्या घटना वाईट असल्याचे सांगायला हवे.
शौरी यांनी मोदी सरकारच्या कामाच्या पद्धतीवरही जोरदार टीका केली आहे. राजकीय व्यवस्थापन करण्यात हे सरकार अपयशी ठरल असल्याचे ते म्हणाले आहेत. मोदी सरकार घटकपक्षांना विश्वासात न घेता योजना राबवित असल्याने काही राजकीय पक्षांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे.