आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arunachal Governor Submit Report In Supreme Court And Updates

अरुणाचल: राष्ट्रपती राजवटीचे कारण गोहत्या, राज्यपालांनी दिले फोटो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज्यपाल जे.पी. राजखोवा (फाइल फोटो) - Divya Marathi
राज्यपाल जे.पी. राजखोवा (फाइल फोटो)
नवी दिल्ली - अरुणाचल प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे कारण गोहत्या असल्याचे राज्यपालांच्या अहवालात म्हटले आहे. राजभवनाबाहेर मिथून गायीची हत्या करण्यात आल्याचा फोटोही अहवालाला जोडण्यात आला आहे. राज्यपाल जे.पी. राजखोवा यांच्या अहवालातून हा खुलासा झाला आहे. हा अहवाल बुधवारी सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आला.

आणखी काय आहे अहवालात
- इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, हा अहवाल राज्यपालांचे वकील सत्यपाल जैन यांनी कोर्टात सादर केली.
- राज्यपालांना हा अहवाल काँग्रेस नेत्यांना दाखवण्याची इच्छा नव्हती कारण ते या प्रकरणात याचिकाकर्ते आहेत.
- राज्यपालांचे वकील जैन म्हणाले, राज्यपालांनी याबद्दल आधीही राष्ट्रपती आणि केंद्रीय गृहमंत्रालयाला कळवले होते.
- जैन म्हणाले, आम्ही कोर्टासमोर सर्व तथ्य सादर करणार आहोत. आम्ही गोहत्येचे फोटो देखिल दाखवणार आहोत. हे फोटो एका अहवालाला जोडलेले आहेत.
- मिथून गाय पूर्वोत्तर राज्यांमध्ये आढळून येते. अरुणाचलमध्ये या गायीला स्टेट अॅनिमलचा दर्जा आहे.
- बुधवारी सुप्रीम कोर्टाने राज्यपालांना 15 मिनिटांत राष्ट्रपती राजवटीची शिफारस करणारी फाइल सादर करण्याचे आदेश दिले होते.
पुढील स्लाइडमध्ये, का लावण्यात आली राष्ट्रपती राजवट