आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arunachal Pradesh Ex CM P.K Thungon Convicted For Graft

सिंचन घोटाळा : अरूणाचलच्‍या माजी मुख्‍यमंत्र्याला साडेचार वर्षाची शिक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली – अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्‍यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रसचे ज्‍येष्‍ठ नेते पी. के. थुंगोन यांच्‍यावर दोन कोटी रुपयांच्‍या सिंचन घोटाळ्याचे आरोप सिद्ध झाल्‍याने विशेष सीबीआय न्‍यायालयाचे न्‍यायाधीश अजयकुमार जैन यांनी आज (सोमवार) त्‍यांना चाडे चार वर्षांची शिक्षा आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला. त्‍यांच्‍यासोबत याच घोटाळ्यातील अन्य दोन आरोपी टाली आव आणि सी. संगीत यांना साडेतीन वर्षांचा, तसेच चौथा आरोपी महेश माहेश्‍वरीला अडीच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.
भ्रष्टाचार विरोधी कायदा व भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार दाखल गुन्ह्यांमध्ये हे सर्व दोषी आढळले आहेत. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेेल थुंगन पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात शहरी विकास व रोजगार राज्यमंत्री होते. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. थुंगन व इतर दोषींवर नागालँडमधील लघुसिंचन प्रकल्पासाठी नियोजन आयोगातर्फे देण्यात आलेल्या २ कोटी रुपयांच्या निधीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप होता. हे दोन कोटी एक-एक कोटी याप्रमाणे दोन टप्प्यात देण्यात आले होते. यात गैरप्रकार झाल्याचे नंतर उघडकीस आले होते. सीबीआयने सन 1998 मध्ये त्यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.