आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arundhati Roy Says Political Movement Is Unprecedented

#Intolerance : लेखिका अरुंधती रॉय, कुंदन शाह यांचीसुद्धा \'पुरस्‍कार वापसी\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बुकर पुरस्‍कार प्राप्‍त अरुंधती रॉय आणि प्रसिद्ध दिग्‍दर्शक कुंदन शाह यांनी आपला पुरस्‍कार परत करण्‍याची घोषणा आज (गुरुवार) केली. अरुंधती यांना वर्ष 1989 मध्‍ये In Which Annie Gives It Those Ones या चित्रपटासाठी सर्वोकृष्‍ट पटकथेचा पुरस्‍कार मिळाला होता. त्‍यांनी म्‍हटले, '' दलित, आदिवासी, मुस्लिम आणि ख्रिश्‍चन धर्माचे लाखो लोक आज दहशहतीखाली जगत आहेत. त्‍यांच्‍चावर कुधी, कुठून हल्‍ला होईल हे सांगता येणार नाही'', अशी भीतीसुद्धा त्‍यांनी व्‍यक्‍त केली. कुंदन शाह यांना इंदिरा गांधी पुरस्‍काराने गौरवण्‍यात आले होते. त्‍याला ते परत करणर आहेत. दरम्‍यान, नीति आयोगाचे सदस्‍य विवेक देबरॉय म्‍हणाले, ''देशात कायम असहिष्‍णुता राहिली आहे,'' असे ते म्‍हणाले. दरम्‍यान, देशात सध्‍या असहिष्‍णुतेच्‍या कारणामुळे अनेक लेखक, चित्रपट निर्माता, दिग्‍दर्शक यांनी आपला पुरस्‍कार परत केला आहे.
#Intolerance च्‍या मुद्यावर गुरुवारी काय झाले ?
1. अरुंधती रॉय : कलाकार आणि बुद्धिजीवी वर्गाची ही '' पॉलिटिकल मूव्‍हमेंट ऐतिहासियाक आहे. यापूर्वी कधीच असे झाले नव्‍हते. माझ्याकडे परत करण्‍यासाठी राष्‍ट्रीय पुरस्‍कार आहे त्‍यामुळे मी आनंदी आहे. माझ्या या निर्णयामुळे मला लेखक, फिल्ममेकर्स आणि अॅकेडेमिक्सच्‍या राजकीय चळवळीत भाग घेण्‍याची संधी मिळाली. ''
2. कुंदन शाह : विनोदी चित्रपटांना क्लासिक दर्जा मिळवून देणारे 'जाने भी दो यारों'चे डायरेक्टर कुंदन शाह म्‍हणाले, '' भाजपच्‍या काळात आता असा चित्रपट बनवने शक्‍य नाही. त्‍यामुळे मी माझा इंदिरा गांधी अवॉर्ड परत देत आहे.''

3. विवेक देबरॉय (नीति आयोगाचे सदस्‍य) : ''देशात कायम इन्टॉलरेंस राहिलेले आहे. एवढेच नाही तर येथील वे ऑफ लाइफमध्‍येही इन्टॉलरेंस सहभागी आहे.''
4. नयनतारा सहगल : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्‍या भाची आणि लेखक नयनतारा सहगल म्‍हणाल्‍या, ‘‘प्रत्‍येक देशाच्‍या सरकारकडून चूक होते. मात्र, सध्‍या भारतातील सरकार जे करत आहे ते अगोदरच कधीच झाले नव्‍हते. मोदी आणि त्‍यांचे सरकार हिंदुत्व वादाला ज्‍याप्रमाणे प्रमोट करत आहेत ते उचित नाही''. अशी भावना त्‍यांनी व्‍यक्‍ती केली. नयनतारा सहगल यांनीही सरकारच्‍या विरोधात साहित्य अकादमी पुरस्कार परत केला आहेत.

5. शंकराचार्य स्वामी निश्चलानंद : आरएसएस आणि भाजपचे निकटवर्तीय असलेले पुरी पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘वास्तविक राजधर्म’ निभवण्‍याचा सल्‍ला दिला. त्‍यांनी म्‍हटले, नरेंद्र मोदी चांगली व्‍यक्‍ती आहेत. मात्र, निर्णय घेण्‍यास अक्षम ठरत आहेत,'' असे ते म्‍हणाले. यापूर्वी वर्ष 2002 मध्‍ये गुजरात दंगलीनंतर तत्‍कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनीही त्‍यावेळी गुजरातचे मुख्‍यमंत्री असलेल्‍या नरेंद्र मोदी यांना असाच सल्‍ला दिला होता.
6. महिमा चौधरी : साहित्यिक आपला पुरस्‍कार परत करत आहेत, हे चुकीचे आहे. विरोधासाठी अन्‍य मार्गसुद्धा आहेत, असे बॉलीवुड अभिनेत्री महिमा चौधरी म्‍हणाल्‍या.

7. तरुण भारतीय: मेघालयातील फिल्ममेकर तरुण भारतीय यांनी गुरुवारी आपला राष्‍ट्रीय पुरस्‍कार परत केला. त्‍यांना तो 'इन कॅमरा' या माहिती पटासाठी 2009 मध्‍ये मिळाला होता.
अरुंधती रॉय यांनी काय म्‍हटले ?
> 'इंडियन एक्सप्रेस'मधील आपल्‍या एका लेखातून पुरस्‍कार परत करण्‍याची घोषणा केली. त्‍यांनी म्‍हटले, देशातील खराब होणा-या माहौलविरुद्ध लेखक, फिल्ममेकर आणि इतर क्षेत्रातील लोक लढत आहेत. अशातच आपण चूप राहिलो तर फूट पडेल आणि आपल्‍याला दफना केले जाईल.''
> त्‍यांनी म्‍हटले, "या राजनीतिचा उद्देश्य काही वेगळा आहे. मी याची भाग झाली त्‍यामुळे आनंदी आहे. मात्र, सध्‍या देशात जे काही सुरू आहे त्‍यामुळे लाज वाटत आहे. "
> 2005 मध्‍ये कॉंग्रेसची सत्‍ता असताना साहित्य अकादमी पुरस्‍कार परत केल्‍याचा उल्‍लेख करताना रॉय म्‍हणाल्‍या, ''जुनी कॉंग्रेस विरुद्ध भाजप या वादापासून या मुद्दाला वेगळे करावे लागणार आहे. हे प्रकरण यापेक्षा पुढे गेले आहे. "
>रॉय म्‍हणाल्‍या, "आज जे काही होत ते असहिष्‍णुता या छोट्या शब्‍दाच्‍याही पलीकडे आहे. देशात दादरी हत्‍याकांड, शूटिंग, बर्निंग आणि जमावाकडून ठार मारणे या सा-यासाठी असहिष्‍णुतासारखा शब्‍द वापरणे योग्‍य नाही.''
> रॉय म्‍हणाल्‍या, ''या प्रकारच्‍या घटनेमुळे देशातील माहौल नर्कासारखा बनत आहे''.
आता 'जाने भी दो यारो' करू शकलो नसतो - कुंदन शाहा
क्लासिक दर्जाचा विनोदी चित्रपट 'जाने भी दो यारो'चे दिग्‍दर्शक कुंदन शाह म्‍हणाले, ''आजच्‍या परिस्‍थ‍ितीमध्‍ये अशा प्रकारचा चित्रपट मी बनवूच शकलो नसतो. कारण यामध्‍ये महाभारताशिवाय इंदिरा गांधींचाही संदर्भ आहे. त्‍यामुळे त्‍यावेळी चित्रपटाच्‍या प्रदर्शनात अडचण आली होती. पण, चित्रपटाला कुठेच कात्री न लावता प्रदर्शित झाला. त्‍याला सरकारी एजेंसी द नॅशनल फिल्म डेव्‍हलपमेंट कॉरपोरेशननेच प्रोड्यूस केले होते. आज या चित्रपटाला मंजुरीच मिळाली नसती. दरम्‍यान, शाह यांनी कॉंग्रेसवरही टीका केली. ते म्‍हणाले, '' हे भाजप किंवा कॉंग्रेसचे प्रकरण नाही. दोनही एक सारखेच आहेत. कॉंग्रेस सत्‍तेत असताना माझा 'पुलिस स्टेशन'वर बॅन आणले गेले.