आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arushi Murder Case Haring In Delhi Supreme Court

आरूषी हत्याकांड प्रकरण: तलवार दाम्पत्याची याचिका फेटाळली

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सुप्रीम कोर्टाने सोमवारी डॉ. तलवार दाम्पत्याची याचिका फेटाळली. तलवार दाम्पत्याची साक्ष होण्यापूर्वी कोर्टात 14 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात येण्याची मागणी आरुषीचे आई-वडील अर्थात डॉ.नूपूर आणि राजेश तलवार यांनी केली होती. परंतु सुप्रीम कोर्टाने त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवली.

14 साक्षीदाचे जबाब पुन्हा नोदवण्यात यावे, या मागणीवर निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने तलवार दाम्पत्यांच्या वकीलाही चांगलेच फटकारले. तसेच कनिष्ठ कोर्टाच्या आदेशाचा आव्हान देण्यासाठी वरिष्ठ कोर्टात का आले? असा सवालही सुप्रीम कोर्टाते तलवार दाम्पत्याला विचारला.

दरम्यान, सीबीआयच्या विशेष कोर्टानेही यापूर्वी 14 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यास नकार दिला होता. डॉ. राजेश तलवार आणि नूपूर तलवार हे दोघे आरूषी-हेमराज दुहेरी हत्याकांडातील आरोपी आहेत, असा सीबीआयचे चौकशी अधिकारी एजीएल कौल यांनी मागील सुनावणीत त्यांचा जबाब नोंदविला होता. या प्रकरणातील ते शेवटचे साक्षीदार होते.

14 वर्षीय आरूषीची हत्या पाच वर्षांपूर्वी झाली होती. आरुषीची हत्या तिच्या घरातील व्यक्तीने केल्याचा दावाही सीबीआयने केला होता. एवढेच नाही तर आरुषीची हत्या तिचे आई-वडील नूपुर आणि राजेश तलवार यांनीच केली असल्याचे सीबीआयने कोर्टात सांगितले होते. चौकशी अधिकारी कौल यांनी सांगितले होते की, आरुषी आणि हेमराजची हत्या झाली तेव्हा तलवार दाम्पतीशिवाय घरात कोणीही उपस्थित नव्हते.