आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरविंदचे चारित्र्य चांगले, वर्तन अयोग्‍यः अण्‍णा हजारेंची नाराजी, दोन मुद्यांवर आक्षेप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली/राळेगरसिद्धी आम आदमी पार्टीचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांच्‍यावर शाई फेकणा-या कार्यकर्त्‍यापासून ज्‍येष्‍ठ समाजसेवक अण्‍णा हजारे यांनी हात झटकले आहे. मी या कार्यकर्त्‍याला ओळखत नाही, असे अण्‍णांनी स्‍पष्‍ट केले आहे. दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाच्‍या नेत्‍या सुषमा स्‍वराज यांनी आपवर टीका केली आहे. केजरीवाल यांनी पक्षाने नाव बदलून 'अमीर आदमी पार्टी' ठेवले पाहिजे, असा टोला स्‍वराज यांनी मारला.

अण्‍णा हजारे यांनी वाल्हेकरपासून हात झटकले असले तरी ते केजरीवाल यांच्‍यावर नाराज दिसत आहेत. त्‍यांनी सांगितले, की पैशाचा कोणताही मुद्दा नाही. परंतु, दोन मुद्यांवर आक्षेप आहे. एक म्‍हणजे, सिम कार्डशी माझा काहीही संबंध नाही. तरीही त्‍यांना आरोपी करण्‍यात आले. दुसरा मुद्दा म्‍हणजे, अरविंद केजरीवाल 29 डिसेंबरला अण्‍णांचे जनलोकपाल विधेयक पारित करण्‍याचे बोलत आहेत. हे विधेयक केजरीवाल दिल्‍लीत कसे काय लागू करु शकतात, असा अण्‍णांचा प्रश्‍न आहे.

राळेगणसिद्धीमध्‍ये अण्‍णांनी पत्रकारांशी चर्चा करताना सांगितले, की माझ्या नावाचा गैरवापर होत असल्‍याचा मला संशय आहे. माझ्या नावाचा वापर करणे योग्‍य नाही. मी अरविंदवर विश्‍वास ठेवला होता. अरविंदने कार्यालय चालविण्‍यासाठी 20 जणांना ठेवले होते. त्‍यांना 30-35 हजार रुपये दरमहा पगार देण्‍यात येत होता. हा जनतेच्‍या पैशांचा दुरुपयोग आहे. मी याबाबत त्‍याला काही बोललो नाही. परंतु, जनतेच्‍या पैशातून जास्‍त खर्च करणे योग्‍य नाही.

एका प्रश्‍नाच्‍या उत्तरात अण्‍णा म्‍हणाले, अरविंदला माझ्यासोबत चर्चा करायची असेल तर मी तयार आहे. अरविंदसोबत माझे शत्रुत्त्व नाही. मला अरविंदच्‍या चारित्र्यावरही संशय नाही.

केजरीवाल यांनी मात्र अण्‍णांचे निकटवर्तीय आपल्‍याला भेटू देत नसल्‍याचे सांगितले.

केजरीवाल यांच्‍यावर नगरच्‍या कार्यकर्त्‍याने फेकली शाई... वाचा पुढील स्‍लाईड्समध्‍ये...