आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arvind Kejariwal News In Marathi, Delhi Court, Tihar Jail

दिल्ली कोर्टाचे ताशेरे, अरविंद केजरीवाल पुन्हा 14 दिवसांसाठी तुरुंगात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्लीतील पतियाळा हाऊस कोर्टाने आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची पुन्हा 6 जूनपर्यंत 14 दिवसांसाठी कोठडीत रवानगी केली. केजरीवाल यांना कायद्याची माहिती नसल्याचे ताशेरे कोर्टाने ओढले. त्यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करणारे भाजप नेते नितीन गडकरी यांना पुढील सुनावणीस हजर राहण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत.
केजरीवाल यांना शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात आले. तेव्हा महानगर न्यायदंडाधिकारी गोमती मिनोचा म्हणाल्या, तुम्ही फरार होणार नाहीत. तुम्ही माझ्या आदेशाला आव्हानही देऊ शकता. कोर्ट फक्त कायदेशीर प्रक्रियेचे पालन करत आहे. इतर नेते मुचलका भरून जामीन घेतात, तर केजरीवाल असे का करत नाहीत? देशात कायद्याबाबत मोठी निरक्षरता आहे. शिक्षितांनाही जामीन व मुचलका यातील फरक कळत नाही.

केजरीवाल म्हणाले की, माझा गुन्हा तरी काय हेच मी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय.

त्यावर कोर्ट म्हणाले, तुम्हाला गुन्हेगार नव्हे तर आरोपी म्हणून सादर करण्यात आले आहे. मी निर्दाेष आहे म्हणून मुचलका भरणार नाही, असे तुम्ही सांगू शकत नाही. ही एक कायदेशीर प्रक्रिया असून त्याचे पालन करायला हवे.