आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arvind Kejariwal News In Marathi, Tihar Jail, Dehli

माझा गुन्हा तरी काय? केजरीवालांनी 'आम' जनतेला विचारला प्रश्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आम आदमी पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी तिहार तुरुंगातून जनतेच्या नावाने एक पत्र लिहिले आहे. यात केजरीवाल यांनी, आपल्याला का अटक करण्यात आली? नितीन गडकरी यांचे भ्रष्टाचार उघडकीस आणणे गुन्हा आहे काय? आदी प्रश्न लोकांना विचारले आहेत. भाजप नेते नितीन गडकरीद्वारा दाखल मानहानी प्रकरणात केजरीवाल यांना तिहार तुरुंगात अटकेत ठेवण्यात आले आहे. पतियाळा हाऊस न्यायालयाने जामीन न घेतल्याप्रकरणी त्यांना 6 जूनपर्यंत तुरुंगात ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ‘भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी मी माझे जीवन सर्मपित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या प्रकरणात माझा गुन्हा तरी काय आहे’, असा प्रश्न अरविंद केजरीवाल यांनी पत्रातून उपस्थित केला आहे.

आणि आता तिहारमध्ये कैदेत आहे.’ पत्रातून त्यांनी लोकांना आपल्यासाठी प्रार्थना करण्याचेही आवाहन केले आहे.

‘आप’चे जनसंपर्क अभियान
अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगातून लिहिलेले पत्र पार्टी नेता मनीष सिसोदिया यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत वाचून दाखवले. केजरीवाल यांना मिळालेल्या न्यायालयीन कोठडीबाबत रणनीती आखण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा आपले वर्चस्व दाखवण्यासाठी ‘आप’ ने व्यापक जनसंपर्क अभियान सुरू केले आहे. या माध्यमातून नितीन गडकरी यांच्या कथित घोटाळ्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाईल असे पक्षनेत्यांनी सांगितले आहे.

मी का जामीन घेऊ ?
पत्रात केजरीवाल यांनी जामिनाबद्दलही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘मला जामीन घेण्यास सांगितले जात आहे. पण मी कोणत्या गुन्ह्यासाठी जामीन घेऊ? नितीन गडकरी, ए.राजा व सुरेश कलमाडी यांच्यासारख्या लोकांनी भ्रष्टाचार केला आहे त्यामुळे त्यांनी जामीन घ्यायला हवा. जर माझ्यासारख्या व्यक्तीसोबत असे घडू शकते तर सामान्य लोकांसोबत काय घडत असेल याची कल्पनाच करणे कठीण आहे. जर मी कोणता गुन्हा केला असेल तर मला कठोर शिक्षा द्या. परंतु गुन्हा नसताना हा तुरुंगवास नको.’ आपण सामान्य जनतेच्या हक्कासाठी शेवटपर्यंत लढत राहू असेही केजरीवाल यांनी पत्रात नमूद केले आहे.