आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arvind Kejariwal News In Marathi, Yogrendra Yadav, Aap

\'लेटर बॉम्ब\'नंतर केजरीवालांचे \'ट्वीट\', \'योगेंद्र यादव हे माझे चांगले मित्र\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सडकून मार खाल्लेल्या आम आदमी पक्षातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. अनेक नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे तर काहींनी पक्षाला रामराम केल्याची तयारीही केली आहे. पक्षातील ज्येष्ठ नेत्याच्या 'लेटर बॉम्ब'मुळे पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी संयमी भूमिका घेतली आहे. मनिष सिसोदिया यांनी आपले सहकारी योगेद्र यांना यांच्यावर घणाघाती आरोप केल्यानंतर केजरीवाल यांनी 'ट्‍विट' करून पक्षात सुरू उठलेला संशयाचा गोंधळ शांत करण्‍याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, आज (श‍निवार) राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. विशेष म्हणजे केजरीवाल यांनी बैठकीदरम्यान 'ट्वीट' करून पक्षातील दोन ज्येष्ठ नेत्यांमध्ये सुरु झालेला वाद शांत करण्‍याचा प्रयत्न केला आहे. केजरीवाल यांनी 'ट्वीट' म्हणाले, 'योगेंद्र यादव हे माझे चांगले मित्र आहेत. पक्षाचे महत्त्वाचे सहकारी आहेत. त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली आहे. योगेंद्र यादव यांनी काही मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यावरही चर्चा केली जाईल'.

शाजिया इल्मी यांनी यांना पुन्हा पक्षात आणण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील, असेही केजरीवाल यांनी एका ट्वीट मध्ये म्हटले आहे.

दरम्यान, केजरीवाल यांनी शाजिया इल्‍मी यांची मनधरणी सुरु केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाजिया इल्मी यांच्यासमोर पक्षात परत येण्यासाठी प्रस्ताव ठेवला आहे. केजरीवाल यांनी ही जबाबदारी अंजली दमानिया यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यात गुरुवारी दमानिया यांनी राजीनामा दिला होता. परंतु काही तासांच्या आत तो मागे घेतला होता.

दुसरीकडे 'आप'ला सोडचिठ्‍ठी देऊन पक्षाबाहेर पडलेले नेते बंगलुरुमध्ये एक बैठक घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. सगळे नेते बैठकीत काय निर्णय घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

योगेंद्र यादवांनी लिहिले पत्र...
योगेंद्र यादव यांनी आपच्या पीएसी समितीला पत्र पाठवून पक्षाच्या कार्यपद्धतीसह केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. यामुळे आपण गेल्या काही दिवसांपूर्वी सर्व पदांचा राजीनामा दिल्याचे म्हटले आहे.

या लिंकवर क्लिक करून वाचा, केजरीवाल यांचे हे पाच निर्णय आम आदमी पक्षासाठी ठरले आत्‍मघातकी!