आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त मौलवीच्या प्रकरणात अरविंद केजरीवालांची माघार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- वादग्रस्त मौलवीचा पाठिंबा मागितल्यावरून गोत्यात आलेले आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी बचावात्मक पवित्रा घेतला आहे. मौलाना तौकीर हे वादग्रस्त असल्याची माहिती आपल्याला नव्हती, असे त्यांनी मंगळवारी एक निवेदन काढून स्पष्ट केले आहे.

बरेली येथ चादर चढवण्यासाठी आपण गेलो होतो. त्या ठिकाणी सर्वांनाच पाठिंबा मागितला होता. मौलवीही तेथे हजर होते. त्यांनाही पाठिंबा देण्याचे आवाहन केले. परंतु या मौलवींविषयी आपल्याला काहीही माहिती नव्हती, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. मुफ्ती नसल्यामुळे आपण फतवा काढला नाही, असे तौकीर यांनी आपल्याला मंगळवारी सांगितले. फतवा फक्त मुफ्तींनाच काढता येतो. फतवा काढणार्‍या 100 सदस्यीय समितीचे हे मौलाना सदस्य आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती आणि बांगलादेशच्या लेखिकेविरुद्ध हत्येचा फतवा काढल्याचा या मौलवींवर आरोप आहे.