आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arvind Kejriwal A Dictator, Aap MLA Vinod Banni Critised

अरविंद केजरीवाल हुकूमशहा, आपचे आमदार विनोद बिन्नी यांची टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अंतर्गत बंडाळीमुळे आम आदमी पार्टी चांगलीच गोत्यात आली आहे. अरविंद केजरीवाल हुकूमशही असून ते जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप ‘आप’चे बंडखोर आमदार विनोदकुमार बिन्नी यांनी केला आहे. काँग्रेस खासदार संदीप दीक्षित यांच्याशी त्यांची सलगी आहे. काँग्रेस आमदारांच्या इशा-यांवर ‘आप’चे सरकार चालत असल्याची टीकाही त्यांनी केली. यावर ‘आप’ने बिन्नींवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची धमकी दिली आहे. जनहिताचे मुद्दे मांडणे हा जर शिस्तभंग असेल तर आपण असे हजार वेळा करू, असे उत्तर बिन्नी यांनी ‘आप’ला दिले आहे.
बिन्नी यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रपरिषदेत केजरीवालांवर टीकास्त्र सोडले. जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता दहा दिवसांत न केल्यास 27 जानेवारीपासून आपण जंतर-मंतरवर उपोषणाला बसू, असा इशाराही बिन्नी यांनी दिला आहे. मात्र, आपण निष्ठावंत सैनिक असून ‘आप’मध्येच राहणार असल्याचेही ते म्हणाले. यावर ‘आप’चे नेते योगेंद्र यादव, संजय सिंह व आशुतोष यांनीही पत्रपरिषद घेऊन बिन्नींवर खोटारडेपणाचा आरोप केला. मंत्रिपद नव्हे, तर लोकसभेच्या तिकिटासाठी बिन्नींचा आटापिटा सुरू आहे. त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईचाच पर्याय उरल्याचे ते म्हणाले.
आहे. बिन्नी यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली जाईल. राजकीय घडामोडींची समिती याबाबत शेवटचा निर्णय घेईल, असे ‘आप’ने स्पष्ट केले.
बिन्नी यांचे आरोप आणि आपचे प्रत्युत्तर
आम आदमी पार्टीचे आमदार विनोदकुमार बिन्नी यांनी मुख्यमंत्री केजरीवाल व आपवर काही आरोप केले. आपनेही त्याला लगेच प्रत्युत्तर दिले. पैकी काही सवाल-जबाब असे :
1. केजरीवाल व शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप यांची मैत्री. ते काँग्रेसच्या इशा-यावर काम करतात.
आपचे उत्तर : बिन्नींचे आरोप खोटे. तेच भाजपने लिहिलेली स्क्रिप्ट वाचतात.
2. सर्व निर्णय बंद खोलीत. केजरीवालांचीच चलती.
उत्तर : निर्णय पाच लोकांची राजकीय समिती घेते. सदस्य सांगतील तसाच निर्णय होतो. कधी कधी केजरीवालांचे म्हणणे ऐकले जाते. कधी कधी नाही.
3. पाणी व विजेच्या मुद्द्यावर जनतेला धोका दिला.
उत्तर : आरोप खोटे आहेत. बिन्नी यांना मंत्री केले नाही. लोकसभेलाही तिकीट नाकारले. म्हणून ते आरोप करत आहेत.
4. दिल्लीचे माजी भ्रष्ट मंत्री व अधिका-यांविरोधात कारवाई नाही.
उत्तर : आम्ही काँग्रेस, भाजपविरोधात कारवाई करू. परंतु तथ्य गोळा झाल्यावर. जाहीरनाम्यातील आश्वासने पाळणार.