आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अरविंद केजरीवाल यांच्या सहकारी संतोष कोळी यांचे निधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुड़गाव- आम आदमी पक्षाच्या (आप) सदस्या आणि अरविंद केजरीवाल यांच्या सहकारी संतोष कोळी यांचे आज (बुधवार) गुड़गाव येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. संतोष कोळी एका अपघातात गंभीर जखमी झाल्या होत्या. उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. दिल्लीतील सुंदर नगरी विधानसभेच्या जागेसाठी कोळी यांना उमेदवारी देण्यात आली होती.

आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी टि्वट करून संतोष कोळी यांचे निधन झाल्याचे जाहीर केले. संतोष कोळींवर उपचार सुरु होते. त्यात त्यांना ह्दयविकाराच्या झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. 'आप'चा संषर्घ सुरुच राहणार असल्याचेही केजरीवाल यांनी सांगितले.

दरम्यान, कोळी यांचा कौशंभी मेट्रो स्टेशनजवळ गेल्या 30 जून रोजी अपघात झाला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. एका भरधाव कारने त्यांच्या मोटरसायकलला धडक दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. राजधानीत वाढीव इलेक्ट्रीक बिलांच्या विरोधात कोळी यांच्या घरापासून मोर्चाला सुरुवात केली होती.
पुढील स्लाइड्सवर वाचा, 'शीला दीक्षितांविरुद्ध अरविंद केजरीवाल मैदानात!'