आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arvind Kejriwal Allegation 5872 Suicides In Gujarat In Last 10 Years

गुजरातमध्ये 10 वर्षांत 5872 शेतकर्‍यांच्या आत्महत्या, अरविंद केजरीवालांचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काही दिवासांपूर्वी गुजरात दौरा केलेल आम आदमी पार्टीचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदींवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. गुजरातमध्ये गेल्या 10 वर्षांमध्ये 5872 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे. याआधीही केजरीवाल यांनी मोदी सरकारने गुजरात विकासाच्या नावाने जनतेला धोका दिल्याचा आरोप केला आहे. केजरीवालांचे म्हणणे आहे, मोदींनी गुजरातमध्ये कोणताही विकास केलेला नाही. गुजरातमधील शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकासान झाले तर त्यांना सरकारकडून कसलीही मदत दिली जात नाही. त्यामुळे गुजरातमध्ये शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत.
गुजरात सरकारने केजरीवालांचे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. राज्य सरकारने दावा केला आहे, की गेल्या 10 वर्षांमध्ये फक्त एका शेतकर्‍याने आत्महत्या केली आहे.
काय आहे सत्यता
नॅशनल क्राइम रेकॉर्डच्या अहवालानुसार, केजरीवालांच्या आरोपात तथ्य असल्याचे दिसून येते. या अहवालानुसार गुजरातमध्ये 2003 ते 2012 दरम्यान 5302 शेतकर्‍यांनी आत्महत्या केली आहे. जर 2002 चा शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचा आकडा यात मिळविला तर, गुजरातमध्ये 5872 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत.

पुढील स्लाइडमध्ये, शेतकर्‍यांच्या भुसंपादनावरुन केजरीवालांचे आरोप