आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arvind Kejriwal And AAP Challanges Latest News In Marathi

आम आदमीच्या दिमतीला ‘आप’ले सरकार; जाणून घ्या, टीम केजरीवालची संपूर्ण माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अरविंद केजरीवाल.. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातील पाईक. आरटीआय आणि जनलोकपाल विधेयकासाठी जिवाचे रान केले. आमरण उपोषण केले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासोबत काम करणार्‍या केजरीवाल यांनी राजकीय पक्ष स्थापन करण्यासाठी अण्णांचीही साथ सोडली. आम आदमी पार्टीची स्थापना केली आणि 28 आमदारही निवडून आणले ते पण केवळ वर्षभराच्या संघर्षात. आता सरकार बनवण्याच्या तयारीत आहेत. जगात केवळ एका वर्षात कोणत्याही राजकीय पक्षाने सरकार स्थापन करण्याचे हे एकमेव उदाहरण असावे. याचे संपूर्ण श्रेय सामान्य माणसांना बरोबर घेऊन उभारलेला लढा आणि यशाच्या नियोजनात गुंतलेल्या लोकांना जाते. यासाठी आपले कामधाम सोडून जगभरातील लोकांनी योगदान दिले. राजकारणातील या प्रयोगामुळे सर्वच चकित झाले. अमेरिकेच्या टाइम मासिकाने लिहिले- ‘अरविंद आणि त्यांच्या सहकार्‍यांनी चांगले काम करून प्रामाणिक सरकार द्यावे, अशी आशा जनता बाळगून आहे.’ याचे पहिले पाऊल म्हणजे मंत्र्यांची निवड करणे. या प्रक्रियेत काही जणांची सर्वात मजबूत दावेदारी आहे.

पुढील स्लाइडमध्ये, झाडूवाल्या पक्षाच्या दिल्ली सरकारमधील 'आम' मंत्री