आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- दिल्ली सरकारने मंजूर केलेल्या जनलोकपाल विधेयकाला केंद्राने मंजुरी दिली झाली नाही तर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊ, असे जाहीर करून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस व भाजपचीही चांगलीच अडचण केली आहे.
अण्णांचा पाठिंबा : दिल्लीच्या जनलोकपाल विधेयकाला अण्णा हजारे यांनीही पाठिंबा दिल्याचे वृत्त आहे. केजरीवाल यांनी नुकतीच दिल्लीत अण्णांची भेट घेतली. यात अण्णांनी पाठिंबा दिल्याचे समजते.
काँग्रेसचा पाठिंबा नाही : कोणत्याही परिस्थितीत एका घटनाबाह्य लोकपाल विधेयकाला काँग्रेस पाठिंबा देणार नाही, असे दिल्ली प्रदेश काँग्रेसचे नेते मुकेश शर्मा यांनी म्हटले आहे. तर भाजपचे जगदीश मुखी यांनी केजरीवाल सरकारवर टीका करताना म्हटले आहे की, लोकपालला मंजुरी दिलेली असताना नवे विधेयक मांडून केजरीवाल काय साध्य करू पाहत आहेत?
दिल्लीचे विधेयक हटकेच : दिल्ली सरकारचे आणि केंद्राचे विधेयक यात तफावत आहे. केजरीवालांच्या विधेयकात मुख्यमंत्र्यापासून शिपायापर्यंत सर्व तसेच त्यांचे कुटुंबीय कक्षेत आहेत. केंद्रीय विधेयकात कमाल 10 वर्षांच्या तर दिल्ली सरकारच्या विधेयकात जन्मठेपेचीही तरतूद आहे. भ्रष्टाचाराची माहिती देणार्याची केंद्रीय विधेयकात दखल नाही. दिल्ली सरकारने पूर्ण संरक्षणाची तरतूद केली आहे.
कोंडी काँग्रेस-भाजपची
केजरीवाल यांनी खरेच राजीनामा दिला तर आपल्या जुन्या मुद्दय़ावर केजरीवालांचा विजय होईल आणि आगामी लोकसभा निवडणुकीत भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर काँग्रेस तसेच भाजपचीही अडचण होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.