आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरविंद केजरीवाल आपची संपूर्ण फेररचना करणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम आदमी पक्षात उभी फूट टाळण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी नवीन पावले उचलण्याची घोषणा केली आहे. आम्ही काही चुका केल्या आहेत. पण आता पक्षाची फेररचना करण्यात येईल. त्याची सुरुवात बूथ स्तरावरून सुरू होईल आणि ती राष्ट्रीय स्तरापर्यंत चालेल, अशी माहिती केजरीवाल यांनी रविवारी दिली.

पक्ष कार्यकारिणीची तीन दिवसांची बैठक आटोपल्यानंतर केजरीवाल म्हणाले की, पक्षाने दीड वर्षापूर्वी मिशन बुनियाद सुरू केले होते. आता आम्ही मिशन विस्तार ची योजना आखत आहोत. केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालावर समाधान व्यक्त केले. आम्ही 430 उमेदवार उभे केले होते. त्यापैकी चौघांचा विजय झाला. आम्हाला 1.3 कोटी मते मिळाली. लोकांना आमच्यापासून किती अपेक्षा आहे हे त्यातून प्रतीत होते, असा उल्लेख त्यांनी केला.

अशी असेल आपची रणनीती
1. एक वर्षात पक्ष बूथ स्तरापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत बदल करणार.
2. पक्षाचे सर्व कार्यकर्ते गावोगाव जाऊन लोकांना पक्षाच्या विचारसरणीची माहिती देतील.
3. जुन्या आणि नवीन लोकांना सोबत घेऊन जिल्हा आणि राज्य समित्यांचे पुनर्गठन केले जाईल.
4. गावात जाऊन संघटना बांधणार्‍यांना काम सोपवले जाईल.
5. राष्ट्रीय कार्यकारिणीची फेररचना होईल. कार्यकारिणी राजकीय सल्लागार समितीची स्थापना करेल.
6. योजनेचा आराखडा तयार करण्यासाठी पृथ्वी रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे