आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्याच प्रयत्नात IIT, IRS, MLA आणि आता CM केजरीवाल, \'नायक\' अनिल कपूर बनणार ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशात शपथविधीनंतर जाहीर भाषण करण्याची तशी परंपरा नाही. मात्र, प्रथमच विधानसभेत निवडूण आलेले आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी रामलिला मैदानावर मुख्यमंत्रीपदाची शपथ ग्रहण केल्यानंतर जाहीर भाषण केले. यात त्यांनी लाचखोरी आणि भ्रष्टाचार करायचा नाही आणि करु द्यायचा नाही असाच मंत्र जनतेला दिला. त्यासोबतच भ्रष्ट अधिकारी कर्मचा-यांची माहिती द्या आणि त्यांना पकडून द्या असेही आवाहन केले आहे. भाषण संपल्यानंतर त्यांनी एक सामूहिक प्रार्थना देखील म्हटली यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळातील महात्मा गांधींच्या सभेची आठवण झाली. यातून त्यांनी दाखवलेला वेगळेपणा आता ते कृतीत कसा उतरवतात हे पाहाणे महत्त्वाचे आहे.
'नायक'मधील अनिल कपूर सारखे मुख्यमंत्री बनणार अरविंद केजरीवाल?
आम आदमी पार्टीच्या विजयानंतर एका जनसभेत पक्षाचे नेते कुमार विश्वास यांनी 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'नायक' चित्रपटाचे पोस्टर हातात घेतलेले होते. त्यात एका बाजूला अभिनेता अनिल कपूर आणि दुस-या बाजूला अमरिश पुरी आणि त्या दोघांचे मध्ये अरविंद केजरीवाल यांची छबी होती. मात्र, आता मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रश्न उपस्थित होतो की, अरविंद केजरीवाल नायक मधील अनिल कपूर सारखे मुख्यमंत्री बनतील का? नायक चित्रपटात अनिल कपूर भ्रष्टाचाराविरोधात जिथल्या तिथे निर्णय घेऊन जनतेला न्याय मिळवून देताना दिसला आहे. रिल लाइफ मधील हा मुख्यमंत्री प्रत्यक्षात दिल्लीत पाहायला मिळेल का? हे पाहाणे ही उत्सूकतेचे राहाणार आहे.

पुढील स्लाइडमध्ये, अनिल कपूर आणि अरविंद केजरीवाल यांच्यातील समानता...