आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्लाईंग मोदीच्या धर्तीवर आला 'मफलर मॅन रिटर्न्स', AAP करते आहे मोदी पॅटर्नची नक्कल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींवर एकीकडे टीकेची झोड उठवणारे आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल निवडणूकीच्या प्रचारासाठी मोदींचीच नकल करताना दिसत आहेत. भाजपच्या सुत्रांचे असे म्हणणे आहे की, लोकसभा निवडणूकी दरम्यान भाजपची प्रचार पध्दती केजरीवाल यांना एवढी आवडली की, त्यांनी या संपूर्ण निवडणूकीदरम्यान भाजपच्या प्रचारपध्दतीचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला. त्यामुळे दिल्ली विधानसभा निवडणूकीत केजरीवाल भाजपची प्रचार स्ट्रॅडजी वापरणार आहेत.

मागील लोकसभा निवडणूकीदरम्यान नरेंद्र मोदींनी जनतेला आणि विशेष करून तरूणांना आपले टार्गेट केले होते. यामुळेच त्यांनी प्रचारासाठी सायबर स्पेसचाही वापर केला होता. अगदी तसेच दिल्ली विधानसभा निवडणूकीत केजरीवाल हा फॉर्म्यूला वापरत आहेत. आम आदमी पार्टीने इंटरनेट आणि मोबाईल अॅप्सच्या मदतीने लोकांपर्यंत पोहोचण्यास सुरूवात केली आहे. या कामासाठी मोदी पॅटर्नप्रमाणेच एक विशेष टीम ठेवण्यात आली आहे. आम आमदी या निवडणूकी भाजप आणि इतर पक्षांच्या पुढे निघून गेले आहे.

रन मोदी रन, फ्लाइंग मोदीनंतर आता केजरीवाल यांचा मफलर मॅन रिटर्न
लोकसभा निवडणूकीत नरेंद्र मोदी यांनी रन मोदी रन, फ्लाइंग मोदी यांसारखे गेम बनवले होते. अगदी तसेच गेम केजरीवाल यांनी बनवले आहेत. यामध्ये केजरीवाल यांचा "मफलर मैन रिटर्न" सध्या मोबाईल अॅप बाजारात धुमाकूळ घालतो आहे. मोबाईल ऑपरेटींग सिस्टीम अँड्रॉईडवर चालणाऱ्या या गेम प्रमाणेच केजरीवालांची प्रतिकृती असलेले अजून सहा गेम गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. मफलर मॅन रिटर्न हा गेम 12 जानेवारीला लॉन्च करण्यात आला होता. याशिवाय इस यावेळी चालणार झाडू आणि आम आदमी रनर यांसारखेही गेम आहेत. एवढेच नव्हे तर आम आदमी पक्षाने त्यांचा वेब रेडीओसुध्दा सुरू केला आहे.

पुढील स्लाईडवर पाहा, इतर फोटो...