आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Arvind Kejriwal Delhi Assembly President Rule Latest News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्लीत राष्ट्रपती राजवटची शिफारस, 23 फेब्रुवारीपासून आपचा प्रचार मोहिमेस प्रारंभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर उपराज्यपाल नजीब जंग यांनी दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी शिफारस केली आहे. जंग यांनी केजरीवाल यांचा राजीनामा राष्ट्रपती यांच्याकडे पाठविला आहे. दुसरीकडे, आम आदमी पक्षाने आता लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे संकेत दिले आहेत. लोकसभा निवडणुकीची प्रचारमोहिमेचा प्रारंभ येत्या 23 फेब्रुवारी रोजी हरियाणा आणि यूपीतून प्रचार रॅली काढणार असल्याचे म्हटले आहे.
भारतीय जनता पक्षाने मात्र आपल्या रणनितीत बदल करताना म्हटले आहे की, भाजप आम आदमी पक्षाच्या विरोधात धरणे आंदोलन देईल. तसेच हे धरणे आंदोलन 16-18 फेब्रुवारी या दरम्यान करण्यात येणार आहे.
आपचा काँग्रेस-भाजपवर हल्लाबोल- आपचे नेते संजय सिंह यांनी भाजप-काँग्रेसवर हल्लाबोल करताना म्हटले आहे की, जनलोकपाल मुद्यांवर भाजप आणि काँग्रेस यांचे एकमत आहे तर त्यांनी आता दिल्लीत सरकारही स्थापन करावे. कारण भाजप आणि काँग्रेस 'आम्ही 40 आहोत' असा नारा देते. भाजपचे 32 तर काँग्रेसचे 8 आमदार आहेत. मनिष सिसोदिया यांनी म्हटले आहे की, आपने मागील सरकारच्या घोटाळ्यांच्याबाबतीत एफआयआर दाखल केला आहे. त्याची प्रामाणिकपणे चौकशी करावी.
सरकार पडावे ही इच्छा नव्हती- प्रशांत भूषण- केवळ 49 दिवस मुख्यमंत्रीपदाची खुर्ची संभाळलेले केजरीवाल यांच्या राजीनाम्याबाबत आपचे संस्थापक सदस्य प्रशांत भूषण यांनी म्हटले आहे की, केजरीवाल यांचे सरकार पडावे असे वाटत नव्हते. भाजप आणि काँग्रेसने आम्हाला राजीनामा देण्यास भाग पाडले आहे. आता अरविंद केजरीवाल लोकसभा निवडणुकीत प्रचार करण्यास आता स्वतंत्र झाले आहेत. आप आजपासूनच झाडू यात्रा सुरु करीत आहे.