आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Arvind Kejriwal Delhi Assembly President Rule Latest News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्लीत लागलीच निवडणुका नाही, आम आदमी पार्टीचे आता मिशन लोकसभा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केवळ 49 दिवसांमध्ये अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आम आदमी पार्टीचे (आप) संस्थापक सदस्य प्रशांत भूषण म्हणाले, केजरीवालांचे सरकार कोसळावे अशी आमची इच्छा नव्हती. मात्र, काँग्रेस आणि भाजपने एकत्र येत केजरीवाल यांना राजीनामा देण्याची परिस्थिती निर्माण केली. आता केजरीवाल लोकसभेत प्रचार करण्यासाठी मोकळे झाले आहेत. आपची आज (शनिवार) लोकसभा निवडणुकीसंबंधीची रणनीती ठरविण्यासाठीची बैठक होणार असून, आजपासूनच पक्षाची झाडू यात्रा सुरु होणार आहे.
राजीनाम्याचा लोकसभा निवडणुकीत फायदा होईल?
या प्रश्नाचे उत्तर लोकसभा निवडणुकीनंतरच मिळणार आहे. मात्र, लोकसभा प्रचारादरम्यान केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाला परिवर्तन आणि स्वच्छ सरकार दे्ण्याच्या त्यांच्या आश्वासनांचे जनतेला उत्तर द्यावे लागणार आहे. शुक्रवारी रात्री 'आप' समर्थकांना संबोधीत करताना, केजरीवाल यांचा उत्साह पाहून अजूनही त्यांच्या कोर टीममध्ये त्यांची क्रेज असल्याचे स्पष्ट जाणवत होते. मात्र, राष्ट्रीय स्तरावर मतदार त्यांना दिल्ली प्रमाणे समर्थन देतील, आणि आप देखील मतदारांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी होईल, या बद्दल आताच काही सांगणे कठीण झाले आहे.

लोकसभेत अंबानी मुद्दा बनणार ?
लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टी नवा नारा (शीला हारी अब मोदी की बारी) देण्यासाठी सज्ज झाली आहे. लोकसभेत आपच्या निशाण्यावर नरेंद्र मोदी राहाणार आहेत. शुक्रवारी केजरीवाल यांनी दिलेल्या भाषणातून लोकसभेत मुकेश अंबानींनाही ते मुद्दा बनविण्याची शक्यता आहे. त्यांनी काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष अंबानींच्या इशा-यावर काम करत असल्याची तोफ डागली आहे. मुख्यमंत्री असतानी त्यांनी अंबानींविरोधात गुन्हाही दाखल केला आहे.
शुक्रवारी समर्थकांसमोर केलेल्या भाषणात केजरीवाल म्हणाले होते, मुकेश अंबानी एकदा म्हणाले होते, की काँग्रेस त्यांची दुकान आहे आणि ते तिथून जेव्हा जे पाहिजे ते खरेदी करु शकतात. गेल्या दहा वर्षांपासून तेच युपीए सरकार चालवत आहेत. मोदींच्या मागेही अंबानींचाच वरदहस्त आहे. मोदी हेलिकॉप्टरने फिरतात, देशभरात मोठमोठ्या सभा घेत आहेत. यासाठीचा पैसा त्यांच्याकडे कुठून आला? जेव्हा आम्ही मुकेश अंबानींकडे बोट केले, तेव्हा काँग्रेस आणि भाजप दोघेही एक झाले आहेत.'