आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाडूवाल्या पक्षाचे दिल्ली सरकारमधील ‘आम’ मंत्री, प्रत्येकाची आहे आगळी-वेगळी कथा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अरविंद केजरीवाल दिल्लीचे सातवे मुख्यमंत्री बनले आहेत. आज 45 वर्षीय अरविंद केजरीवाल यांनी शपथ घेतली आणि ते देशातील सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले आहेत. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर जनतेला भ्रष्टाचार न करण्याची आणि लाच न देण्याची आणि न घेण्याची शपथ देऊन त्यांनी आपला इरादा स्पष्ट केला आहे. भारताच्या राजकीय इतिहासात प्रथमच असे घडत आहे, की मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण कॅबिनेट प्रथमच विधानसभेत पाऊल ठेवत आहे. अरविंद केजरीवाल मुळचे हरियाणामधील हिस्सार येथील आहेत. या भागातील व्यक्ती हरियाणा किंवा दिल्लीचा मुख्यमंत्री होण्याची आज चौथी वेळ आहे.

जनलोकपाल आंदोलनामुळे देशभरात ओळख निर्माण झालेले अरविंद केजरीवाल आज दिल्लीचे मुख्यमंत्री बनले आहेत. त्याआधी ते 'परिवर्तन' आणि 'पब्लिक कॉज रिसर्च फाउंडेशन' या दोन स्वयंसेवी संस्थाचे (एनजीओ) संचालक होते. त्याआधी ते आयकर विभागात सह आयुक्त पदावर कार्यरत होते. मात्र, नंतर त्यांनी नोकरी सोडली होती. आयआयटी खरगपूरमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर त्यांनी तीन वर्षे टाटा स्टीलमध्ये काम केले होते.

मुख्यमंत्री केजरीवाल स्वतः कोणताही बडेजाव मिरवत नाही. ते आम आदमी सारखेच स्वतःला सादर करतात. त्यांच्या पक्षातील नेते देखील आम आदमी पक्षाचे प्रतिनिधीत्व करतात. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यानंतर त्यांच्या कॅबिनेटमधील महत्त्वाचे मंत्री मनीष सिसोदिया व्यवसायाने पत्रकार होते. नतंर त्यांनी सामाजिक कार्याला प्रारंभ केला. सौरभ भारद्वाज खासगी क्षेत्रात नोकरी करीत होते. राखी बिर्ला या एका खासगी वृत्तवाहिनीमध्ये पत्रकार होत्या. सोमनाथ भारती व्यवसायाने वकील आहेत. गिरीश सोनी यांचा चामड्याचा उद्योग असून ते केजरीवाल यांच्या कॅबिनेटमधील सर्वात कमी शिक्षीत मंत्री आहेत. सत्यंद्र गर्ग हे व्यवसायाने इंजिनिअर आहेत.

पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, आम आदमी पक्षाचे मंत्री कोण आहेत...